वर्ल्डकप नेमबाजीत भारत नंबर वन ५ सुवर्ण

वर्ल्डकप नेमबाजीत भारत नंबर वन ५ सुवर्ण
वर्ल्डकप नेमबाजीत भारत नंबर वन ५ सुवर्ण

भारताने एकूण २२ पदकांची कमाई केली

 • पुढील वर्षी होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांकडून अपेक्षा बऱ्याच उंचावल्या आहेत. 
 • रिओत झालेल्या वर्ल्डकप नेमबाजीत भारताने ५ सुवर्ण आणि प्रत्येकी २ रौप्य व ब्राँझपदकांसह अव्वलस्थान मिळविल्यामुळे भारतीय नेमबाजांवरचा विश्वास आता आणखी वाढला आहे. 
 • या वर्षीच्या चार वर्ल्डकपमध्ये भारताने एकूण २२ पदकांची कमाई केली आहे. 
 • त्यातच १० मीटर एअर रायफल नेमबाजी महिला गटाच्या जागतिक क्रमवारीत भारताच्या अपूर्वी चंडेला, अंजुम मुदगिल आणि वलरिव्हन एलावेलिन यांनी पहिले तीन क्रमांक पटकाविल्यामुळे एकूणच भारताने नेमबाजीत जागतिक स्तरावर पहिले स्थान मिळविले आहे. 
 • भारताचे युवा नेमबाज मनू भाकेर आणि सौरभ चौधरी यांनी आयएसएसएफ वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुलच्या मिश्र गटात सुवर्णयश पटकावले. याच प्रकारात भारताच्या यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्माने रौप्यपदकाची कमाई केली.
 • मिश्रच्या एअर पिस्तुलच्या फायनलमध्ये मनू-सौरभ जोडीने शेवटपर्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत आपलेच सहकारी यशस्विनीसिंग देसवाल-अभिषेक वर्माला १७-१५ असे नमविले. मनू आणि सौरभ दोन्ही सतरा वर्षांचे आहेत. अंतिम फेरीत अनेक चढ-उतार बघायला मिळाले. मनू-सौरभ सुरुवातीला ३-९ने पिछाडीवर होते. यानंतर ते ७-१३ आणि ९-१५ असे पिछाडीवर पडले होते. मात्र, त्यांनी हार मानली नाही. यानंतरच्या सलग चार फेऱ्या जिंकून त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीला निष्प्रभ केले. तत्पूर्वी, पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत मनू-सौरभ जोडीने ४०० पैकी ३९४ गुणांची कमाई केली. अखेरच्या सीरिजमध्ये तर या जोडीने प्रत्येकी १०० गुण मिळवले. 
 • यशस्विनी आणि अभिषेक जोडीने ३८६ गुण मिळवून दुसरे स्थान पटकावले होते. यातील अव्वल आठ जोड्या अंतिम फेरीत दाखल झाल्या.
 • मनू-सौरभ जोडीने वर्ल्डकपमधील एअर पिस्तुलमध्ये चारही सुवर्णपदके आपल्या नावे केले आहेत. 

वर्ल्डकपमध्ये भारताचे वर्चस्व:-

 • या वर्षाच्या चारही वर्ल्डकपमध्ये भारतीय नेमबाजांनी निर्विवाद वर्चस्व राखले. ब्राझीलमध्ये झालेल्या या वर्ल्डकपमध्येही भारतीय नेमबाजांनी आपला दबदबा राखला. मंगळवारी संपलेल्या या वर्ल्डकपमध्ये भारताने पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन ब्राँझ, अशी एकूण नऊ पदके पटकावली. या वर्ल्ड कपमध्ये इतर देशांच्या नेमबाजांना एक सुवर्णपदकाच्या वर कमाई करता आली नाही.
 • भारताने या वर्षातील चारही वर्ल्डकपमध्ये मिळून २२ पदकांची कमाई केली आहे. गेल्या वर्षी भारताने वर्ल्डकपमध्ये एकूण १९ पदके मिळवली होती. 

पदकतक्ता:-

अपूर्वी, अंजुम, वलारिव्हन पहिल्या तीन क्रमांकांत:-

 • भारताच्या अपूर्वी चंडेला, अंजुम मुदगिल व वलारिव्हन एलावेनिल यांनी जागतिक क्रमवारीत पहिल्या तीन क्रमांकांवर स्थान मिळविले आहे. 
 • चारही वर्ल्डकपमध्ये झालेल्या भारताच्या कामगिरीनंतर रायफल नेमबाजीत भारतीय महिलांनी चमकदार खेळ केल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 • अपूर्वी पहिल्या क्रमांकावर असून तिच्या खात्यात २२०० गुण आहेत तर अंजुम आणि वलरिव्हन अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांवर असून त्यांच्या खात्यात १६५६ व १४६५ गुण आहेत. 
 • १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात यशस्विनी देसवालने १२३५ गुणांसह चौथे स्थान मिळविले आहे. १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात पुरुषांमध्ये अभिषेक वर्मा आणि सौरभ चौधरी हे पहिल्या तीनमध्ये अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. अभिषेकचे १९६८ गुण तर सौरभचे १८५४ गुण आहेत. 
 • २५ मीटर पिस्तुल नेमबाजीत राही सरनोबत पहिल्या १० मध्ये नवव्या क्रमांकावर आहे. तिच्या खात्यात ८७० गुण आहेत. १० मीटर एअर रायफलच्या पुरुष गटात दीपककुमार (६९९) आणि दिव्यांश पन्वर (६४९) हे अनुक्रमे १० व ११व्या क्रमांकावर आहेत.
   

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »