भारत गाठेल सात टक्के विकासदर IMF

भारत गाठेल सात टक्के विकासदर IMF
भारत गाठेल सात टक्के विकासदर IMF

नाणेनिधीचे उपसंचालक जोनाथन ऑस्ट्री यांचे प्रतिपादन

  • जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या अंदाजित विकासदरात घट केली असली तरी पुढील आर्थिक वर्षात मात्र भारतीय अर्थव्यवस्था मुसंडी मारेल, असे नाणेनिधीने म्हटले आहे.
  • २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था सात टक्के विकासदर साधेल, असा अंदाज नाणेनिधीने बुधवारी व्यक्त केला.
  • कंपनी करातील कपात व रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात केली जाणारी कपात यामुळे भारतीय अर्थव्यवस्था पुढील आर्थिक वर्षात वेग धरेल, असे नाणेनिधीने स्पष्ट केले. नाणेनिधीचे उपसंचालक (आशिया पॅसिफिक क्षेत्र) जोनाथन ऑस्ट्री यांनी पत्रकारांशी बोलताना हे मतप्रदर्शन केले.
  • ऑस्ट्री म्हणाले की, 'चालू आर्थिक वर्षासाठी भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराचा अंदाज आम्ही यापूर्वीच घटवून ६.१ टक्क्यांवर आणला आहे.
  • पुढील आर्थिक वर्षात मात्र भारतीय अर्थव्यवस्थेत कमालीची वाढ होईल असे जाणवते आहे.
  • रिझर्व्ह बँकेचे पतधोरण (रेपो कपात), कंपनी करामध्ये केलेली कपात व अन्य महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचे चांगले परिणाम यामुळे पुढील आर्थिक वर्षात भारत सात टक्के विकासदर गाठेल.'

मरगळ अनाकलनीय:-

  • भारतीय अर्थव्यवस्थेतील सध्याच्या मरगळीमुळे आम्हालाही (नाणेनिधी) आश्चर्याचा धक्का बसला आहे.
  • उद्योगधंद्यांचे नियमन व कायदे, अडचणीत आलेल्या बिगर बँकिंग वित्तीय संस्था आणि ग्रामीण भागांतील घटती मागणी यामुळे ही मरगळ आली आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

[NOTE : IMF बद्दल सर्व महत्त्वाची माहिती VISION STUDY वर उपलब्ध आहे कृपया तिथून वाचावी.]

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »