बेळगावात देशातील पहिल्या महिला सैन्य भरतीला सुरुवात

बेळगावात देशातील पहिल्या महिला सैन्य भरतीला सुरुवात
बेळगावात देशातील पहिल्या महिला सैन्य भरतीला सुरुवात

मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या शिवाजी स्टेडियमवर ही भरती प्रक्रिया पार पडत आहे

बेळगावात देशातील पहिल्या महिला सैन्य भरतीला सुरुवात झाली आहे. १ ते ५ ऑगस्टरदम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार असून तरुणींचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, अंदमान निकोबार येथील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या शिवाजी स्टेडियमवर ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

दहावीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. जवळपास तीन हजार उमेदवारांची शारीरिक चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. शारीरिक चाचणीमध्ये धावणे, लांब उडी आणि उंच उडीचा समावेश आहे. पाऊस पडत असतानाही तरुणींचा उत्साह कायम होता. यावेळी अनेक महिला उमेदवारांना चक्कर आली. तिथे उपस्थित महिला पोलीस आणि जवानांनी तात्काळ वैद्यकीय मदत पुरवली.

शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या महिला उमेदवारांची नंतर वैद्यकीय तपासणी होईल. आणि त्यानंतर लेखी परिक्षेला सामोरं जावं लागेल. देशात एकूण ५ ठिकाणी ही भरती प्रक्रिया सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »