कुस्तीपटू बजरंग पुनियाला खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

कुस्तीपटू बजरंग पुनियाला खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस
कुस्तीपटू बजरंग पुनियाला खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे

भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कुस्तीत लागोपाठ चांगले प्रदर्शन करणाऱ्या बजरंग पुनियाला यावर्षीचा राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार मिळावा यासाठी भारतीय कुस्ती महासंघाकडून या प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. 

बजरंग पुनियासोबतच महिला कुस्तीपटू विनेश फोगाटच्या नावाची शिफारस सुद्धा करण्यात आली आहे.

पुनियाने नुकतीच तबिलिसी ग्रां. प्री मध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. यावेळी त्याने इराणच्या पेइमान बिबयानीचा पराभव करून ६५ किलो गटात सुवर्ण पदक पटकावले होते. भारतातील अव्वल कुस्तीपटू बजरंगने चीनमध्ये आयोजित आशियाई चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवून आशियात आपला दबदबा कायम ठेवण्यात यश मिळवले होते.

बजरंगने गेल्यावर्षी आशियाई खेळात तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सुद्धा सुवर्ण पदक पटकावले होते. १२ सदस्यीय निवड समितीने पुनियाच्या नावाला पसंती दर्शवली आहे. या समितीतीत सर्व सदस्यांनी एकमताने पुनियाच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या समितीत बायचूंग भूतिया, मेरी कोम यासारखी क्रीडा क्षेत्रातील नावे आहेत. 

१२ सदस्यीय निवड समिती खेलरत्न पुरस्कारासाठी आणखी एका आघाडीच्या क्रीडापटूचे नाव सूचवू शकते.  

बजरंग पुनिया:-

भारतातील हरियाणा राज्यामधील झज्जर जिल्ह्यात असलेल्या खुदान गावी बजरंग पुनियाचा जन्म झाला. वयाच्या सातव्या वर्षापासून त्याने कुस्ती खेळायला सुरुवात केली आणि हा खेळ खेळण्याकरता त्याचे वडील बलवान सिंग यांनी त्याला प्रोत्साहन दिले.

कारकीर्द:-

  • २०१३ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा : नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६० किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले.
  • २०१३ जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा : बुडापेस्ट, हंगेरी येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६० किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले.
  • २०१४ राष्ट्रकुल स्पर्धा: ग्लासगो, स्कॉटलंड येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६१ किलो वजनी गटात रजत पदक मिळवले.
  • २०१४ आशियाई खेळ: दक्षिण कोरियातील इंचीऑन येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६१ किलो वजनी गटात रजत पदक मिळवले.
  • २०१४ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा : अस्ताना, कझाकिस्तान येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६१ किलो वजनी गटात रजत पदक मिळवले.
  • २०१७ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा : नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६० किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले.
  • २०१८ राष्ट्रकुल स्पर्धा: गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले.
  • २०१८ आशियाई खेळ : बजरंगने इंडोनेशिया येथील जकार्ता येथे झालेल्या २०१८ सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंगने ६५ किलो वजनी गटात अंतिम फेरीत जपानच्या ताकातानी दाईईची या मल्लास हरवून सुवर्ण पदक मिळवले.
  • २०१८ जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा: बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात अंतिम सामन्यात जपानी मल्ल ताकुतो ओतुगारो याच्याकडून १६-९ असा पराभव पत्करावा लागल्यामुळे बजरंगला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.या पदामुळे जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत दोन वेळा पदके मिळवणारा तो पहिलाच भारतीय ठरला.

पुरस्कार:-
पद्मश्री पुरस्कार(२०१९)

प्रश्न:-

खेल रत्न पुरस्कारासंदर्भात योग्य असलेले विधान/विधाने निवडा 
अ. हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
ब. गेल्यावर्षी (२०१८) भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू या दोघांना हा पुरस्कार मिळाला होता.
क. विश्वनाथन आनंद हे या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले होते.
ड. नेमबाज अभिनव बिंद्रा हा पुरस्कार मिळविणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. 
पर्याय:-
१ फक्त अ आणि ब योग्य 
२ फक्त अ आणि क योग्य
३ फक्त अ आणि ड योग्य
४ अ, ब, क आणि ड योग्य 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »