भारताचे गगनयान

भारताचे गगनयान
भारताचे गगनयान

गगनयान अंतराळवीरांचा शोध

मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले या घटनेला शनिवारी (20 जुलै) पन्नास वर्षे होत आहेत. जगभरात याचा आनंदोत्सव साजरा होत आहे. तर दुसरीकडे भारताची मानवी अंतराळ मोहिमेची जय्यत तयारी सुरू आहे. आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारतीय अंतराळवीर शोधण्याचे काम हाती घेतले आहे. देशातील तीन अंतराळवीरांची या मोहिमेसाठी निवड होणार असून, त्यांना सन २०२२मध्ये 'गगनयाना'तून अंतराळात धाडण्यात येणार आहे. 

अंतराळ क्षेत्रात संशोधन करणाऱ्या अग्रेसर देशांमध्ये भारताचे नाव आघाडीवर आहे. यामुळे भारताने मानवी अंतराळ मोहिमेची घोषणा केली आणि त्याचे 'गगनयान' असे नामकरण करण्यात आले. या 'गगनयाना'तून जाणारे अंतराळवीर कोण असतील याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. याची निवड प्रक्रिया नुकतीच 'इस्रो'ने जाहीर केली आहे. यात महिला अंतराळवीर असेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. 'इस्रो'ने याबाबत अद्याप गुप्तता पाळली आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'इस्रो' यामध्ये चाचणी घेणाऱ्या वैमानिकांना (टेस्ट पायलट) प्राधान्य देणार आहेत. याबाबत भारतीय हवाई दल आणि इस्रो यांच्यात बोलणी झाल्याचेही सूत्रांकडून समजते. 

आत्तापर्यंतच्या अंतराळ मोहिमांमध्ये ६० टक्के अंतराळवीर चाचणी वैमानिकच होते. नील आर्मस्ट्राँग हेही नव्या विमानांची चाचणी घेणारे वैमानिक होते. जर सरकारने येत्या काही महिन्यांत या मोहिमेत महिला अंतराळवीरास पाठवण्याचा निर्णय घेतलाच, तर या नियमाला छेद दिला जाईल, असे 'इस्रो'तील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. तसेच अंतराळवीरांचे वय हे २८ ते ३८च्या दरम्यान असावे, अशी अटही 'इस्रो'ने घातली आहे. (चाचणी वैमानिकच...८) 

असे असेल प्रशिक्षण

- तीन अंतराळवीरांचे तीन गट तयार करणार 

- अंतिम तीन जणांचे 'गगनयाना'तून उड्डाण 

- अंतराळवीर निवडप्रक्रिया १२ ते १४ महिने 

- तीन महिने शारीरिक, मानसिक, वैद्यकीय तपासणी 

- भारतातील प्रशिक्षणानंतर रशियात प्रगत प्रशिक्षण 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »