हृतिक रोशनचे आजोबा आणि प्रख्यात दिग्दर्शक निर्माते जे ओमप्रकाश यांचं निधन

हृतिक रोशनचे आजोबा आणि प्रख्यात दिग्दर्शक निर्माते जे ओमप्रकाश यांचं निधन
हृतिक रोशनचे आजोबा आणि प्रख्यात दिग्दर्शक निर्माते जे ओमप्रकाश यांचं निधन

जे ओमप्रकाश यांचं वृद्धापकाळानं निधन

राकेश रोशन यांचे सासरे, हृतिक रोशन याचे आजोबा आणि प्रख्यात दिग्दर्शक निर्माते जे. ओमप्रकाश यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. जे ओमप्रकाश हे हृतिकची आई पिंकी रोशन यांचे वडील होते. 

हृतिकनं काही दिवसांपूर्वीच जे ओमप्रकाश यांच्यासोबतचे दोन फोटो शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर 'आजोबांनी दिलेली शिकवण आता मी माझ्या मुलांना देणार आहे', असं म्हणत हृतिकनं त्याच्या आयुष्यातील आजोबांचं स्थान अधोरेखित केलं होतं. 

१९६१ साली ‘आस का पंछी’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. १९७४ मध्ये ‘आप की कसम’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा होता. अफसाना दिलवालों का, 'आदमी खिलौना है, आदमी और अफसाना, भगवान दादा, अर्पण, आसपास, आशा असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. 
 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »