अलिबाबा चे संस्थापक जॅक मा निवृत्त

अलिबाबा चे संस्थापक जॅक मा निवृत्त
अलिबाबा चे संस्थापक जॅक मा निवृत्त

वयाच्या ५५ व्या वर्षी निवृत्त

 • ‘तुम्ही नावीन्यपूर्ण विचार करत आहात, म्हणजे आजच्या दिवसाकडे उद्याच्या दृष्टिकोनातून पाहात आहात…’ असा यशाचा पासवर्ड सांगत ‘अलिबाबा’ या कंपनीच्या माध्यमातून स्वत:चं आर्थिक साम्राज्य निर्माण करणारे ‘अलिबाबा’ या चीनच्या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक जॅक मा आज वयाच्या ५५ व्या वर्षी निवृत्त झाले. 
 • कंपनीचे सीईओ डॅनियल झांग यांच्याकडे त्यांनी कंपनीच्या कारभाराची सर्व सूत्रे दिली आहेत. अमेरिका-चीन दरम्यान व्यापार संघर्ष सुरू असतानाच निवृत्त होणारे जॅक मा आता निवृत्तीनंतर शिक्षण क्षेत्रात काम करणार आहेत.
 • जॅक मा निवृत्त झाले तरी २०२०च्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत कंपनीच्या संचालक मंडळावर कार्यरत राहणार आहेत. कंपनीचे सल्लागारपदही ते सांभाळणार आहेत. तसेच त्यांची ४१.७ अब्ज डॉलरची संपत्ती शिक्षणविषयक प्रकल्पांना देणार आहेत.
 • जॅक मा यांनी १९९९ मध्ये अलिबाबा ही कंपनी सुरू केली होती. त्यापूर्वी ते इंग्रजीचे शिक्षक म्हणून काम करत होते. चीनच्या व्यापाऱ्यांना थेट अमेरिकेतील व्यापाऱ्यांशी देवाण-घेवाण करता यावी म्हणून जॅक मा यांनी अलिबाबा ई-वाणिज्य कंपनी सुरू केली होती. 
 • ‘अलिबाबा’ने चीनमध्ये लाखो रोजगार दिले असून, कंपनीचा व्यापही बहुतेक सर्व देशांत पोहोचला आहे. त्यामुळे, चीनमधील सर्वांत लोकप्रिय ‘व्हीआयपीं’मध्ये त्यांची गणना होऊ लागली आहे. या यशाच्या टप्प्यावर असतानाच त्यांनी कंपनीतून ‘एक्झिट’ जाहीर केली. ‘तुम्ही तुमच्या विशीतील आयुष्य शिकण्यासाठी घालवा, तिशी-चाळीशीमध्ये धोके स्वीकारा आणि पन्नाशीनंतर ज्या गोष्टी उत्तम साधतात, त्या गोष्टींसाठी जगा,’ हा सल्ला ते नेहमी द्यायचे. तोच कित्ता गिरवत ते आता पुन्हा शिक्षणक्षेत्राकडे वळत आहेत.

जॅक मा आणि अलिबाबा:-

 • अलिबाबा ही आता चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी झाली आहे आणि जॅक मा आशियातले सर्वांत श्रीमंत उद्योजक. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार त्यांची एकूण संपत्ती 3740 लाख डॉलर्स म्हणजेच 2.43 लाख कोटी रुपये इतकी आहे.
 • जॅक यांनी त्यांच्या करीअरची सुरुवात ही शिक्षक म्हणून केली. शिक्षाकापासून उद्योजकापर्यंत आणि जगातल्या श्रीमंतांपैकी याचाएक होण्यापर्यंतचा जॅक यांचा प्रवास अचंबित करणारा आहे.
 • जॅक यांनी 1999मध्ये हांगझूच्या एका अपार्टमेंटमध्ये अलीबाबा कंपनीची सुरुवात केली. त्यावेळी त्यांचं काम पाहून लोकांनी त्यांना बिनकामाचा रिकामटेकडा माणूस समजत दुर्लक्ष केलं.
 • बिल गेट्स किंवा स्टीव जॉब्सप्रमाणेच जॅक यांच्याकडे देखील कंप्युटर सायन्सची कुठलीच डिग्री नव्हती. १९८० मध्ये त्यांनी एका शाळेत शिक्षकाची नोकरी केली आहे. 3 वर्षानंतर नोकरी सोडून स्वतःची कंपनी सुरू केली.
 • 1994 मध्ये जेव्हा ते त्यांच्या व्यवसायाशी संबंधित अमेरिकेत गेले होते तेव्हा त्यांनी पहिलांदा इंटरनेट पाहिलं आणि ते थक्क झाले. त्यानंतर चीनमध्ये 'मिस्टर इंटरनेट' या नावाने प्रसिद्ध झाले. 
 • शिक्षक म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जॅक यांना सुरुवातीच्या काळात अजिबात लक्षणीय यश मिळालेलं नव्हतं. अलिबाबाचं यशसुद्धा त्यांना सहजासहजी नाही मिळालेलं. तब्बल ३० नोकऱ्यांध्ये निराशा पदरी पडल्यानंतर त्यांनी अलीबाबा सुरू करण्याचं ठरवलं.
 • 21 फेब्रुवारी 1999 ला जॅक मा ने अलीबाबा या कंपनीची स्थापना केली आणि कंपनीत इन्व्हेस्ट करण्यासाठी त्यांनी 17 मित्रांना तयार केलं. सुरुवातीच्या अडचणींनंतर त्यांच्या कंपनीने वेगाने प्रगती सुरू केली.
 • २०१३ पर्यंत ते अलिबाबाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर त्यांनी अध्यक्ष म्हणून या कंपनीचा कारभार सांभाळला. 

“If you don’t give up, You still have a Chance to Win. Giving up is a Great Failure.”
-JACK MA

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »