जायकवाडी धरणाची सुरक्षा वाढवली

जायकवाडी धरणाची सुरक्षा वाढवली
जायकवाडी धरणाची सुरक्षा वाढवली

आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण जायकवाडी

  • नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील जलसाठा 90 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणातून विसर्गही करण्यात येत आहे. लोकांची वर्दळ वाढल्याने दुर्घटना टाळण्यासाठी जायकवाडी धरणाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
  • नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत चांगला पाऊस झाल्याने कोरड्याठाक असलेल्या मराठवाड्यातील जायकवाडी धरण भरले आहे. नाथसागर भरल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. 
  • मात्र आता पर्यटकांना धरणाच्या भिंतींवर जाण्यापासून रोखण्यात आले आहे. तर परिसरात खासगी गार्ड आणि पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे जायकवाडी धरणावर सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • पूर्वी धरणावर चार पोलीस कर्मचारी कार्यरत होते. आता त्यात वाढ करण्यात आली असून धरणावर १२ सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या वतीनेही खासगी सुरक्षा गार्ड वाढवून सर्व बाजूच्या चौक्यावर २४ तासांचा खडा पहारा ठेवणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
  • तर लष्कर ए तोयबाचे दहशतवादी तामिळनाडूत घुसल्याची बातमी गुप्तचर विभागाने दिल्यानंतर देशातील सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवरही धरणाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
  • गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी आता खासगी व्यक्तींना धरणावर जाण्यास बंदी केली आहे. तसेच शासकीय कर्मचारी यांनासुद्धा गेटवर ओळखपत्राची खात्री झाल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नयेत, असे आदेश देण्यात आले आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण जायकवाडी:-

  • जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. 
  • जायकवाडी हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळपास 2.40 लाख हेक्टर क्षेत्र या धरणांमुळे ओलिताखाली आलेली आहे. 
  • जायकवाडी या धरणाचे संपूर्ण बांधकाम हे माती व दगडाचे आहे. 
  • हे धरण औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहारनजीक असलेल्या जायकवाडी या गावांमध्ये आहे. 
  • धरणाचे बांधकाम हे 1965 साली सुरू झाले होते व ते 1976 मध्ये पूर्ण झाले. या धरणांमुळे जवळपास 35000 हेक्टर जमीन ओलिताखाली आली. 
  • धरणाची सर्वोच्च उंची 41.3 मी. आहे व लांबी 9997.67 मी. आहे.
  • जायकवाडी धरणाला नाथसागर नावानेही ओळखले जाते. नाथ महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पैठण नगरीतील हे धरण महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण म्हणूनही धरणाचा नावलौकिक आहे. 
  • शंकरराव चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या धरणाचा जन्म झाला. लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी या तत्कालीन पंतप्रधानांचे पाय या मातीला लागलेले आहेत. 
  • मराठवाड्याची तहान भागवणे, शेती फुलवणे, उद्योग धंदे वाढावे या उद्देशाने या धरणाची स्थापना करण्यात आली होती. धरणाची 102 टीमसी पाणीसाठा येवडी प्रचंड क्षमता आहे.

दरवाजे:-

  • धरणाचे दरवाजे S आकाराचे असून त्यांची लांबी 471 मी. इतकी आहे. जायकवाडी धरणाला एकूण 27 दरवाजे आहेत, त्यापैकी 9 दरवाजे हे आपत्कालीन परिस्थिती मध्ये उघडण्यात येतात.
  • या दरवाजांचा आकार हा 12.50 × 7.90 मी. आहे. धरणातून 22656 एव्हडा सर्वोच्च विसर्ग केला जाऊ शकतो.

पाणीसाठा:-

  • धरणाचे एकूण क्षेत्रफळ हर जवळपास 350 वर्ग किमी. आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2909 दशलक्ष घनमीटर असून त्यातील वापरण्यायोग्य क्षमता ही 2170 दशलक्ष घनमीटर आहे. 
  • धरणामध्ये एकूण 35000 हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली आहे. धरणामुळे जवळपास 105 गवे हे ओलिताखाली गेलेली आहेत.

कालवा:-

  • डावा कालवा:- धरणाचा डावा कालवा हा 208 किमी लांबीचा आहे व त्याची क्षमता 100.80 घनमीटर/सेकंद आहे.
  • उजवा कालवा:- धरणाचा उजवा कालवा हा 132 किमी लांबीचा आहे व त्याची क्षमता 67.71 घनमीटर/सेकंद आहे.

वीज उत्पादन:- 

  • जायकवाडी धरणातील जलप्रपाताची उंची 94 फूट आहे. धरणाची वीज निर्मित क्षमता ही 12 मेगा वॅट आहे.

जायकवाडी पक्षी अभयारण्य:-

  • जायकवाडी धरणात विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी बघायला मिळतात. नाथ सागर जलाशयात 30 विविध आकाराचे बेट तयार करण्यात आलेले आहेत. पक्षासाठी लावण्यात आलेल्या झाडांमुळे येथे येणाऱ्या स्थलांतरित पक्षांचे प्रमाण हे अधिक आहे. 
  • जायकवाडी परिसरात जवळपास 200 प्रजातीचे पक्षी आढळतात, ज्यामध्ये 70 प्रजाती या बाहेर देशातून आलेले असतात. या स्थलांतरीत पक्षामध्ये प्रामुख्याने क्रेन, फ्लिमिंगो,पिंटेल,गॉडविट्स हे पक्षी आढळतात.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »