कर्तारपूर मार्गिकेचे काम पाकिस्तानच्या बाजूने ९० टक्के पूर्ण

कर्तारपूर मार्गिकेचे काम पाकिस्तानच्या बाजूने ९० टक्के पूर्ण
कर्तारपूर मार्गिकेचे काम पाकिस्तानच्या बाजूने ९० टक्के पूर्ण

नोव्हेंबरमध्ये उद्घाटनाचे नियोजन

कर्तारपूर मार्गिकेचे काम पाकिस्तानने नव्वद टक्के पूर्ण केले असल्याचे प्रसारमाध्यमांच्या बातम्यांत म्हटले आहे. गुरू नानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त भारतातील भाविकांना नोव्हेंबरमध्ये गुरूद्वारा साहिब या पाकिस्तानातील शीखांच्या तीर्थक्षेत्री प्रवेश दिला जाणार आहे, त्याच वेळी या मार्गिकेचे उद्घाटनही केले जाईल.

पाकिस्तानातील कर्तारपूर येथील दरबार साहिब हे ठिकाण भारतात गुरूदासपूर जिल्ह्य़ातील डेरा बाबा नानक या धार्मिक स्थळाशी या मार्गिकेने जोडले जाणार आहे. पाकिस्तानातील दरबार साहिब येथे भारतातील शीख भाविकांना व्हिसा मुक्त प्रवेश दिला जाणार आहे.

शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव यांनी पाकिस्तानातील धर्मस्थळाची स्थापना केली होती. भारतातून शीख भाविकांची पहिली तुकडी ९ नोव्हेंबरला पाकिस्तानातील दरबार साहिब येथे रवाना होणार असून किती भाविकांना प्रवेश दिला जाणार हे समजलेले नाही. कर्तारपूर मार्गिकेचे काम पाकिस्तानातील बाजूने ९० टक्के पूर्ण करण्यात आले असून त्यात मुख्य रस्ता, पूल व काही इमारतींचे बांधकाम झाले आहे. नोव्हेंबरमध्ये गुरू नानक यांच्या जयंतीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व लष्कर प्रमुख जावेद बाजवा हे या मार्गिकेचे उद्घाटन करणार आहेत. दोन्ही देशांनी याबाबत संपर्कात राहण्याचे ठरवले आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये भारत व पाकिस्तान यांनी गुरूद्वारा दरबार  साहिब हे पाकिस्तानमधील कर्तारपूरचे ठिकाण व डेरा बाबा नानक हे भारतातील गुरूदासपूर जिल्ह्य़ातील ठिकाण जोडण्याचे ठरविले होते. भारतीय सीमेवरून गुरूद्वारा नानक साहिब हे ठिकाण दिसते. पण, तेथे जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे भाविक सीमेवरूनच द्विनेत्रीतून दर्शन घेत असत.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »