प्रसिद्ध साहित्यिक नाटककार किरण नगरकर यांचं निधन

प्रसिद्ध साहित्यिक नाटककार किरण नगरकर यांचं निधन
प्रसिद्ध साहित्यिक नाटककार किरण नगरकर यांचं निधन

हिंदू लिटररी प्राइज जर्मनीचा ऑर्डर ऑफ मेरिट आणि साहित्य अकादमीच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आलं

  • 'सात सक्कं त्रेचाळीस', 'रावण अँड एडी', 'ककल्ड', 'द एक्स्ट्राज' आदी क्लासिक कादंबऱ्यांनी साहित्यप्रेमींच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारे प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, पटकथा लेखक, नाटककार आणि अस्तित्ववादी साहित्याचा बिनीचा शिलेदार किरण नगरकर यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ७७ वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्यक्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
  • किरण नगरकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच आज रात्री ८.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
  • नगरकर यांनी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून भाषेच्या सीमा ओलांडल्या होत्या. त्यांनी मराठीबरोबरच इंग्रजीतही लिखाण केलं होतं.
  • मराठी साहित्य विश्वात त्यांची सात सक्कं त्रेचाळीस आणि ककल्ड ही कादंबरी प्रचंड गाजली. या दोन्ही कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वातील क्लासिक कादंबरी म्हणून गणल्या जातात.
  • त्यांना हिंदू लिटररी प्राइज, जर्मनीचा ऑर्डर ऑफ मेरिट आणि साहित्य अकादमीच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होतं.

नगरकरांच्या कादंबऱ्या:-
•    सात सक्कं त्रेचाळीस
•    रावण अँड इडी
•    ककल्ड
•    गॉड्स लिट्ल सोल्जर
•    रेस्ट अँड पीस
•    जसोदा : अ नॉवेल


नाटक:-
•    बेडटाइम स्टोरी
•    कबीराचे काय करायचे
•    स्ट्रेंजर अमंग अस
•    द ब्रोकन सर्कल
•    द विडो ऑफ हर फ्रेंड्स
•    द एलिफंट ऑन द माऊस
•    ब्लॅक टुलिप

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »