मलिंगाची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती

मलिंगाची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती
मलिंगाची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. जगभरातून मलिंगावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहने देखील मलिंगाच्या खेळाची वाहवाही केली आहे. 

लसिथ मलिंगाने शेवटचा एकदिवसीय सामना बांगलादेश विरोधात खेळला. या सामन्यातही ३८ धावा देत मलिंगाने तीन विकेट घेतल्या. एकूण २२५ सामन्यांमध्ये मलिंगाने ३३८ विकेट्स घेतल्या आहेत. बांगलादेश संघातर्फेही त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. रोहित शर्मानेही मलिंगासाठी खास ट्विट केलं आहे.'गेल्या १० वर्षांत मुंबई इंडियन्ससाठी एक सामनावीर निवडायला सांगितला तर माझ्या डोळ्यासमोर पहिलं नाव लसिथ मलिंगाचेच येईल. कर्णधार असताना मलिंगानी कायम माझ्यावरचा ताण कमी केला आणि अपेक्षांची पूर्तता केली आहे. संघामध्ये त्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. मलिंगा तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा'. 

तर जसप्रीत बुमराहनेही मलिंगाच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.' मलिंगा! तू क्रिकेटसाठी जे काही केलं आहे त्यासाठी धन्यवाद. मी कायम तुझ्याचकडून शिकत आलो आहे आणि येत्या काळातही शिकत राहीन'.याशिवाय क्रिकेटमधील इतर दिग्गजांनीही मलिंगाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

वर्ल्डकपमध्ये दमदार प्रदर्शन
इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचा संघ सेमी फायनल गाठू शकला नाही. परंतु वेगवान गोलंदाज मलिंगाने वयाची 35 शी मध्येही आपली छाप सोडली. वर्ल्डकप 2019 मध्ये मलिंगाने 7 लढतीत 13 बळी घेतले.

कारकिर्दीवर एक नजर
2004 रोजी मलिंगाने एक दिवसीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले. 15 वर्षाच्या कारकीर्द मध्ये मलिंगाने श्रीलंके कडून 225 एक दिवसीय लढतीत 335 बळी मिळवले. मुरलीधरन (523 बळी) आणि चामिंडा वास (399 बळी) नंतर श्रीलंकेकडून सर्वाधिक बळी मलिंगाच्या नावावर आहेत. तसेच 20 कसोटीत 101 बळी आणि 73 टी-20 लढतीत 97 बळींची नोंद मलिंगाच्या खात्यात आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »