उषा खन्ना यांना लता मंगेशकर पुरस्कार

उषा खन्ना यांना लता मंगेशकर पुरस्कार
उषा खन्ना यांना लता मंगेशकर पुरस्कार

हिंदी चित्रपटसृष्टीतील मोजक्या महिला संगीतकारांमध्ये ७७ वर्षीय खन्ना यांची गणना

 • मुंबई चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून पदार्पणातच 'दिले देके देखो' या पहिल्या चित्रपटातील गाण्यांपासूनच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या संगीतकार उषा खन्ना यांना राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला आहे. 

उषा खन्ना:-

 • उषा खन्ना यांनी दिल देके देखोसह शबनम, सौतन, साजन बिना सुहागन अशा गाजलेल्या चित्रपटांना संगीत दिले. 
 • हिंदी चित्रपटसृष्टीतील मोजक्या महिला संगीतकारांमध्ये ७७ वर्षीय खन्ना यांची गणना होते. 
 • मधुबन खुशबू देता है, छोडो कल की बातें, पल भर के लिए कोई हमे, तेरी गलियों में ना रखेंगे कदम, अशी त्यांची गाणी अजूनही रसिकांच्या स्मरणात आहेत.

 

 • सन १९५९ पासून त्यांनी संगीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी सुमारे सहा दशके या क्षेत्रामध्ये काम केले. 
 • सन १९६०-१९८० या तीन दशकांच्या संगीत दिग्दर्शनाच्या यशस्वी कारकीर्दीत त्यांनी अनेक नवीन गायकांना गाण्याची संधी दिली. त्यांनी काही मालिकांसाठीही संगीत दिग्दर्शन केले. 
 • त्यांनी संगीत दिलेली व गायलेली भजने लोकप्रिय झाली. सन २००३ मध्ये प्रदर्शित झालेला 'दिल परदेसी हो गया' हा त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट. संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण न घेता त्यांनी हा संपूर्ण यशस्वी प्रवास केला हे विशेष. 

'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार':-

 • गायन व संगीत या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केलेल्यांना १९९३पासून 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारा'ने गौरविण्यात येते. 
 • राम-लक्ष्मण, उत्तम सिंग, प्रभाकर जोग, गायिका पुष्पा पागधरे, कृष्णा कल्ले आदींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

स्वरूप:-

 • पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 
 • सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने २०१९-२० साठीच्या पुरस्कारासाठी ही निवड केल्याचे जाहीर करण्यात आले. 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »