जगातली सर्वोच्च उंचीवरची मॅरेथॉन लद्दाखमध्ये झाली

जगातली सर्वोच्च उंचीवरची मॅरेथॉन लद्दाखमध्ये झाली
जगातली सर्वोच्च उंचीवरची मॅरेथॉन लद्दाखमध्ये झाली

मॅरेथॉन समुद्रसपाटीपासून 11000 फूटांहून अधिक उंचीवर

  •  7 आणि 8 सप्टेंबर 2019 रोजी जम्मू व काश्मीरच्या लेह या शहरात जगातली सर्वोच्च उंचीवरची धावशर्यत असलेल्या ‘लद्दाख मॅरेथॉन’ची आठवी आवृत्ती आयोजित केली गेली होती. 
  •  या कार्यक्रमात भारताच्या विविध भागातून आणि 25 परदेशांमधून 6 हजाराहून अधिक धावपटू सहभागी झाले होते. 
  •  हा कार्यक्रम लद्दाख ऑटोनोमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल (LAHDC) यांच्याद्वारे प्रायोजित होता.

स्पर्धेचे विजेते:-

  • 72 किलोमीटर अल्ट्रा खारडुंग ला चॅलेंज - शबीर हुसेन (पुरुष), क्रिस्टीना वॉल्टर (आयर्लंड)
  • 42 किलोमीटर फूल मॅरेथॉन - जिग्मेट डोल्मा (महिला) (सलग तिसर्‍या वर्षी अव्वल स्थान), शबीर हुसेन (पुरुष)
  • हाफ मॅरेथॉन (महिला) - ताशी लाडोल

लेह मॅरेथॉन स्पर्धेविषयी:-

  • मॅरेथॉन समुद्रसपाटीपासून 11,000 फूटांहून अधिक उंचीवर आयोजित केली जाते. 
  • ही जगातली सर्वोच्च उंचीवरची मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते.
  • हा कार्यक्रम चार वर्गांमध्ये विभागला जातो ते आहेत – 72 किलोमीटर अल्ट्रा खारडुंग ला चॅलेंज, 42 किलोमीटर फूल मॅरेथॉन आणि 21 किलोमीटर हाल्फ मॅरेथॉन आणि 7 किलोमीटर रन फॉर फन.
  • ही मॅरेथॉन प्रथम सन 2012 मध्ये आयोजित करण्यात आली होती. मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »