विश्वचषक पात्रता सामन्यातून मेसी निलंबित

विश्वचषक पात्रता सामन्यातून मेसी निलंबित
विश्वचषक पात्रता सामन्यातून मेसी निलंबित

निलंबनामागे मेसीने कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर केलेले विधान कारणीभूत

अर्जेटिनाचा नामांकित फुटबॉलपटू लिओनेल मेसीला २०२२च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पुढील वर्षी होणाऱ्या पहिल्या पात्रता सामन्यातून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय त्याच्यावर दीड हजार डॉलर दंडाची कारवाईसुद्धा केली आहे.

काही दिवसांपूर्वीच ६ जुलै रोजी झालेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील चिलीविरुद्ध झालेल्या सामन्यात मेसीला लाल कार्ड दाखवण्यात आले होते. त्यामुळेच मेसीला या सामन्यासाठी निलंबित करण्यात आल्याचे दक्षिण अमेरिकन फुटबॉल महासंघाने जाहीर केले.

परंतु या निलंबनामागे मेसीने कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर केलेले विधान कारणीभूत आहे, असे समजते आहे. ‘‘कोपा अमेरिका स्पर्धेच्या आयोजकांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांनी स्पर्धेपूर्वीच ब्राझीलला विजेतेपद मिळवून देण्याचे ठरवले होते,’’ अशी खळबळजनक प्रतिक्रिया मेसीने व्यक्त केली होती. परंतु या वक्तव्यासाठी त्याने महासंघाकडे माफीसुद्धा मागितली.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »