कॉर्पोरेट कर घटवल्याने भारतात गुंतवणूक वाढेल

कॉर्पोरेट कर घटवल्याने भारतात गुंतवणूक वाढेल
कॉर्पोरेट कर घटवल्याने भारतात गुंतवणूक वाढेल

भारतातील गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम

  • कॉर्पोरेट कर कमी करण्याच्या भारताच्या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने स्वागत केले आहे.
  • या निर्णयाचा भारतातील गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम होईल, असे नाणेनिधीने म्हटले आहे.
  • त्याचवेळी भारताने वित्तीय स्थितीसमोरील आव्हाने परतवून लावली पाहिजेत, जेणेकरून वित्तीय स्थिती दीर्घकाळापर्यंत स्थिर राहू शकेल, असे देखील सांगितले आहे.
  • नाणेनिधीचे संचालक (आशिया पॅसिफिक विभाग) चांगयोंग री यांनी येथे पत्रकार परिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, भारताला अर्थव्यवस्था सावरण्यासाठी मर्यादित वाव असल्याने त्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी.
  • कॉर्पोरेट कर घटवण्याच्या भारताच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा देतो. कारण त्यामुळे गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम होणार आहे.
  • भारतातील गेल्या दोन तिमाहींमधील मंदी पाहता चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ६.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे. हा दर सन २०२० मध्ये वाढून सात टक्के होऊ शकतो.

कॉर्पोरेट कर:-

  • मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने कंपनी करात कपात करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता याद्वारे कोणत्याही प्रकारची सवलत न घेणाऱ्या कंपन्यांच्या करामध्ये कपात करून दर २२ टक्के करण्यात आले होते.

 

 

 

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »