भारतातील पहिला बेट जिल्हा माजुली बेट

भारतातील पहिला बेट जिल्हा माजुली बेट
भारतातील पहिला बेट जिल्हा माजुली बेट

पहिला बेट जिल्हा : माजुली बेट

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत 400 km sq क्षेत्रफळ असणाऱ्या माजुली बेटाला जिल्ह्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला  मान्यता देण्यात आली.
पूर्वी माजुली बेट हे आसाम मधील जोरहाट जिल्ह्याचा उपविभाग होता.
एखाद्या बेटाला जिल्ह्याचा दर्जा देण्याची हि भारताच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. हा आसाम मधील 34 वा जिल्हा असेल. हे बेट ब्रम्हपुत्रा नदीच्या मध्यात तयार झालेले डेल्टा क्षेत्र आहे. हे नदीच्या मध्यात तयार झालेले जगातील सर्वात मोठे डेल्टा क्षेत्र आहे.
या बेटाच्या उत्तरेला सुबानसिरी नदी,दक्षिणेला मुख्य ब्रम्हपुत्रा नदी व ईशान्येला ब्रम्हपुत्राची वितरिका खेरकाटीय सुली. या बेटावर मिशिंग जमातीची संख्या जास्त आहे. समाजसुधारक संत श्रीमंता शंकरदेवा यांनी 15 व्या शतकात सुरू केलेल्या आसामी नववैष्णव संस्कृतीचे मुख्य क्षेत्रमाजुली बेट जैवविविधतेने संपन्न आहे. जमिनीच्या धूप होण्याचे प्रमाण बेटावर जास्त आहे. 1891 मध्ये याचे क्षेत्रफळ 1250 km2 होते आता ते 400 km2 च्या आसपास आहे.
 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »