मुहम्मद युनुस यांना लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस पुरस्कार

मुहम्मद युनुस यांना लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस पुरस्कार
मुहम्मद युनुस यांना लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस पुरस्कार

शांतता व सौहार्द प्रस्थापित करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार

  • बांग्लादेशाचे नोबेल पुरस्कार विजेते प्रा. मुहम्मद युनुस यांना व्हॅटिकनचा प्रतिष्ठित 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार दिला गेला आहे. 
  • हा पुरस्कार सोहळा 3 सप्टेंबर 2019 रोजी इटलीमधील पापल बॅसिलिका ऑफ असिसी या ऐतिहासिक जागी झाला.
  • शांतता व सौहार्द प्रस्थापित करण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला गेला आहे. लोकांमध्ये शांतता आणि संवाद वाढविण्याकरिता एखाद्या व्यक्तीने केलेल्या विशिष्ट कामासाठी हा पुरस्कार दिला जातो.
  • 'लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस' पुरस्कार सर्वप्रथम 1981 साली पोलिश कामगार नेते लेच वालेसा यांना देण्यात आला होता. 
  • दलाई लामा, मिखाईल गोर्बाचेव्ह आणि अँजेला मर्केल हे इतर काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ज्यांना यापूर्वी हा पुरस्कार मिळालेला आहे.

व्हॅटिकन सिटी:-

  • व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वांत लहान स्वतंत्र शहर-देश आहे.
  • व्हॅटिकन सिटी शहर इटलीमधील रोम शहरामध्ये वसले आहे व पोपचे अधिकृत निवासस्थान आहे.
  • व्हॅटिकनची लांबी केवळ १.०५ किमी व रुंदी ०.८५ किमी आहे.
  • पोप हा व्हॅटिकनच्या सरकारचा प्रमुख आहे. बासिलिका ऑफ सेंट पीटर हे येथील प्रमुख चर्च आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »