आम्ही जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पीएम मोदी

आम्ही जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पीएम मोदी
आम्ही जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पीएम मोदी

UN भाषणातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी

 • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त राष्ट्राच्या महासभेत बोलताना पाकिस्तानचे नाव न घेता दहशतवादावर कडाडून हल्ला चढवला. आमचा आवाज म्हणजे जगाला दहशतवादाविरोधात जागृत करणे होय.
 • दहशतवाद हा मानवतेसाठी आणि जगासाठी एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे संपूर्ण जगाने दहशतवादाविरोधातील लढाईसाठी एकत्र यायला हवे.
 • आम्ही जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध दिला आहे.
 • दहशतवादाविरोधात जगाने एकत्र यायला हवे. संयुक्त राष्ट्राला नवी शक्ती आणि नवी दिशा देण्याचे काम करावे लागणार आहे.
 • सव्वाशे वर्षापूर्वी स्वामी विवेकानंद यांनी विश्व धर्म संसदेत जगाला एक संदेश दिला होता. सद्भावना आणि शांती हा तो संदेश होता. भारताकडून जगाला आजही हाच संदेश आहे.
 • जर जगभरातील देश दहशतवाद्याच्या मुद्द्यावरून वेगवेगळी झाली तर ते संयुक्त राष्ट्राच्या सिद्धांतावर अन्याय होईल. भारताने विश्व बंधुत्वाची महान परंपरेला पुढे नेण्याचे प्रयत्न केले आहेत.
 • संपूर्ण जग यावर्षी महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करीत आहे. सत्य आणि अहिंसा हाच त्यांचा संदेश असून तो विश्वाच्या शांतीसाठी आणि प्रगतीसाठी आजही महत्त्वपूर्ण आहे.
 • पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी भारताने नेहमीच प्रयत्न केले आहेत. आमच्याकडून कार्बन उत्सर्जन आणि ग्लोबल वॉर्मिंगमध्ये सर्वात कमी योगदान राहिले आहे. परंतु, पर्यावरणासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत.
 • भारत सिंगल यूज प्लास्टिक विरोधात मोहीम राबवत असल्याची माहितीही मोदी यांनी यावेळी दिली.
 • आगामी ५ वर्षात जल संरक्षणेला प्रोत्साहन देण्यासाठी १५ कोटी घरांत पाणी पोहोचवले जाणार आहे. भारतात स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवली जात आहे.
 • आम्ही ५ वर्षात ११ कोटी शौचालय बनवले. हा जगासाठी एक प्रेरणा देणारा संदेश आहे.
 • जगाने क्षयरोग (टीबी) मुक्त करण्यासाठी २०३० चे लक्ष्य ठेवले आहे. परंतु, आम्ही २०२५ पर्यंत भारत टीबीमुक्त करू असा, विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »