नाम देशांनी परस्पर सहकार्य वाढवावे एस जयशंकर

नाम देशांनी परस्पर सहकार्य वाढवावे एस जयशंकर
नाम देशांनी परस्पर सहकार्य वाढवावे एस जयशंकर

नाम च्या बैठकीत जयशंकर बोलत होते

 • 'भौगोलिक आव्हानांवर मात करण्यासाठी अलिप्ततावादी चळवळीतील (नाम-नॉन अलाइन्ड मुव्हमेंट) देशांना एकत्र येऊन बहुपक्षीय सहकार्य वाढवणे गरजेचे आहे,' असे मत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले.
 • 'नाम'च्या बैठकीत जयशंकर बोलत होते. अजरबैजान येथील बैठकीविषयी जयशंकर यांनी 'ट्विटर'वर माहिती दिली.
 • जयशंकर म्हणाले, 'नाम चळवळ अतिशय महत्त्वाची असून, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश लोकसंख्या 'नाम'च्या सदस्यदेशांची आहे.
 • त्यामुळे या देशांनी एकत्र येण्याची गरज आहे. या देशांपुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, समस्या आहेत. मात्र, त्या सोडवण्यासाठी एकत्रपणे काम करणे आवश्यक आहे.' '१९६१ मध्ये सर्बियात नाम सुरू झाली. त्याचे संदर्भ सातत्याने बदलत गेले.
 • कोणत्याही महासत्तांच्या गटात नसलेल्या या देशांमध्ये विकासाची प्रक्रिया पार पडली. जागतिकीकरण, आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानातील बदल या देशांनीही आपलेसे केले. त्यामुळे आता बदलत्या संदर्भात या देशांकडे पाहणे गरजेचे आहे.
 • हवामान बदल, पर्यावरणाचा ऱ्हास, दहशतवाद, गरिबी, नैसर्गिक अपत्ती, सायबर आपत्ती, सुरक्षा व्यवस्थेचे प्रश्न आदी प्रश्न या देशांना भेडसावत आहेत.
 • या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एकत्रित सहकार्य गरजेचे ठरणार आहे,' असे जयशंकर या बैठकीमध्ये म्हणाले.

अलिप्त राष्ट्रगट चळवळ (Non-Aligned Movement):-

 • अलिप्तता हा शब्दप्रयोग सर्वप्रथम पंडित नेहरूंनी १९५४मध्ये कोलंबोतील एका भाषणात केला. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात लष्करी स्वरुपाच्या व गटातटाच्या राजकारणापासून अलिप्त राहणे म्हणजे अलिप्ततावाद होय. ’होकारात्मक तटस्थता’ असा अलिप्ततेचा अर्थ लावता येईल. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू भारताच्या अलिप्ततावादाची धोरणाचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की, “कोणत्याही राष्ट्राचे अंकित म्हणून न राहता, आम्ही एक स्वतंत्र राष्ट्र या नात्याने आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेऊ; आम्ही सत्तागटाच्या राजकारणापासून अलिप्त राहू इच्छितो. अमेरिका, रशिया या महासत्तांच्या गटामध्ये सामील न होता जागतिक व्यासपीठावर भारतास सन्मानाचे स्थान मिळविता येईल.” ’अलिप्ततावादाचे उद्गाते’ असे नेहरूंना संबोधले जाते. नेहरूंनी आपल्या आचरणातून अलिप्ततावादाला आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे स्थान प्राप्त करून दिले. विधायक क्रियाशील व निश्चित स्वरूपाचा नीतीप्रवाह म्हणून अलिप्ततावादी धोरणास महत्त्व आहे.

अलिप्त राष्ट्रगट चळवळीच्या उदयाची कारणे:-

 • नवस्वतंत्र राष्ट्रांमधील राष्ट्रवाद, वसाहतवादाला विरोध, विकासाचा आणि आर्थिक मदतीचा प्रश्न, सांस्कृतिक आणि वांशिक बंध : पाश्चात्य संस्कृतीहून या राष्ट्रांच्या संस्कृत्या अलग, विकासप्रक्रियेसाठी शांतीची आवश्यकता.

अलिप्ततावादी चळवळीची मुख्य वैशिष्ट्ये:-

 • समाजवादाचा अंगीकार, आर्थिक विकासाबाबत क्रांतीकारक दृष्टिकोन, राजकीय दृष्टिकोन, संरक्षणसिद्धता, असामान्य नेतृत्व.

उद्देश:-

 • धोरण ठरविण्याबाबत स्वातंत्र्याची इच्छा, सार्वत्रिक युद्धात न गुंतण्याची इच्छा, जागतिक शांततारक्षण, आर्थिक विकास, नैतिक युक्तिवाद, संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात सहकार्य, आणि परस्परांना आर्थिक आणि तांत्रिक मदत.

दोष:-

 • अर्थाबाबत संदिग्धता आणि स्पष्ट विश्लेषणाचा अभाव. काही अभ्यासकांच्या मते हे धोरण राष्ट्रहित जोपासणारेच असून वेळ आल्यास संधिसाधूपणास राजरोस मान्यता देणारे आहे. अलिप्त राष्ट्रगट चळवळीच्या इतिहासात याची उदाहरणे सापडतात हे खरेच आहे.

प्रश्न : खालीलपैकी बिनचूक असणारे विधान/विधान ओळखा.

अ अलिप्त राष्ट्रगट चळवळ (Non-Aligned Movement) या संघटनेचे मुख्यालय मध्य जकार्ता, इंडोनेशिया येथे स्थित आहे.

ब या संघटनेचे सध्या १२१ सदस्य देश आहेत.

क भारत हा या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे.

१ फक्त अ आणि क

२ फक्त क

३ फक्त ब

४कोणतेही नाही

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »