आंध्र प्रदेशला राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार

आंध्र प्रदेशला राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार
आंध्र प्रदेशला राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार

राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार 2019

 • भारताने व्यावसायिक पर्यटनात मोठ्या प्रमाणात सुधारणा केली असून, 'रेड टेप' ला सामोरे जावे लागणाऱ्या पर्यटकांना आता 'रेड कार्पेट वेलकम' केले जात असल्याचे उपाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सांगितले.
 • जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजिलेल्या 'राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार २०१७-१८' या समारंभात पर्यटनविषयक सर्वांगीण विकासासाठी आंध्र प्रदेशला सर्वोत्कृष्ट राज्याचे पारितोषिक नायडू यांच्या हस्ते देण्यात आले.
 • यंदा विविध विभागांमध्ये ७६ पुरस्कार देण्यात आले आहेत.
 • साहसी पर्यटन विभागात गोवा आणि मध्य प्रदेश विभागून विजेते ठरले.
 • सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रमोशन फ्रेंडली राज्याचा पुरस्कार उत्तराखंडला मिळाला.
 • आयटीचा नावीन्यपूर्ण वापर करण्यासाठीचा सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार तेलंगणाला मिळाला.
 • 'आयटीडीसी'च्या हॉटेल अशोकने बैठकीसाठीचे उत्कृष्ट ठिकाण म्हणून पुरस्कार पटकावला.

राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार 2018:-

 • २०१८ साली युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सिटी अहमदाबाद आणि मांडू यांना संयुक्तपणे 'बेस्ट हेरिटेज सिटी' म्हणून घोषित करण्यात आले होते, तर कुतुबमीनारला नवी दिल्लीतील राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारांमध्ये वेगवान-सक्षम मैत्री स्मारकाच्या मानांकित मानाचा मान मिळाला होता.
 • २०१८ मध्ये देशात पर्यटन क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या 77 हॉटेल्स व संस्थांना विविध श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले होते.
 • गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्याला तीन पुरस्कार मिळाले होते त्याबाद्दल इतंभूत माहिती खालीलप्रमाणे:-
 • मुंबई येथील मेलुहा-द- फर्न आणि औरंगाबाद येथील ‘लेमन ट्री हॉटेल’ यांच्यासह मुंबई येथील ‘ग्रासरूट जर्नी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला सन्मानित करण्यात आले होते.
 • मुंबई येथील मेलुहा-द-फर्न या हे देशातील सर्वोत्तम पर्यावरणस्नेही हॉटेल ठरले. पवई येथील हिरानंदानी गार्डन्स येथे स्थित या पंचातारांकित हॉटेलमध्ये अभ्यागत व पर्यटकांना उत्तम सुविधा पुरविण्यासोबतच पर्यावरणस्नेही वातावरण जपण्यात आले आहे.
 • औरगांबाद येथील लेमन ट्री हॉटेल देशातील सर्वोत्तम थ्री स्टार हॉटेल ठरले होते. दरम्यान अजिंठा व वेरूळ लेण्यांना भेट देणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांसह चिखलठाणा, वाळुंज , चितगाव, शेंद्रा व पैठण या औद्योगिक क्षेत्रांना भेटी देणाऱ्या उद्योजकांची पहिली पसंती या हॉटेलला मिळाली होती.
 • तसेच गेल्या वर्षीच मुंबई येथील ग्रासरूट जर्नी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला देशातील सर्वोत्तम ग्रामीण कृषी पर्यटन प्रकल्पाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या संस्थेने ग्रामीण भागाशी नाळ जोडून ग्रामीण जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

प्रश्न:- 2019 चे भारताचे पर्यटनमंत्री कोण आहेत?

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »