दिल्लीसारखं प्रदूषण कोणत्याही देशात नाही - सर्वोच्च न्यायलय

दिल्लीसारखं प्रदूषण कोणत्याही देशात नाही - सर्वोच्च न्यायलय
दिल्लीसारखं प्रदूषण कोणत्याही देशात नाही - सर्वोच्च न्यायलय

गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक वायूप्रदुषणाची नोंद

 • राजधानी दिल्ली आणि शेजारची राज्ये तीव्र वायूप्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याने तेथील जनजीवन विस्कळीत आणि भयभीत झाले आहे.
 • यंदा गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक वायूप्रदुषणाची नोंद करण्यात आली आहे.
 • या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात टिप्पणी केली आहे. दिल्लीत जी परिस्थिती आहे, तशी कोणत्याही सुसंस्कृत देशांमध्ये नसते, जगण्याचा अधिकार सर्वात महत्वाचा आहे.
 • दिल्लीतील प्रदुषणाच्या समस्येवरून सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा या राज्यांना देखील शेतातील तण जाळण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे.
 • सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, दिल्ली दरवर्षी गुदमरते व आपण काहीच करू शकत नाही आहोत, दरवर्षी अशी परिस्थिती उद्भवते व ती १० ते १५ दिवसांपर्यंत कायम राहते, असे सुसंस्कृत देशात होत नाही.
 • सर्वोच्च न्यायालयाने हे देखील सांगितले की, आम्ही अशाप्रकारे नाही राहू शकत, केंद्राने व राज्याने काहीतरी करायला हवे, कारण आता खूप झालं आहे. या शहरातील एकही घर राहण्याच्या दृष्टीने सुरक्षित नाही.
 • आम्ही यामुळे आमच्या आयुष्यातील मौल्यवान वर्षे गमावत आहोत. ही परिस्थिती भयानक असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, केंद्र सरकार म्हणून व राज्य सरकार म्हणून तुम्हाला काय करावं वाटतं? प्रदुषण कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? अशी देखील विचारणा न्यायालयाने केली.
 • याचबरोबर अतिशय कडक शब्दात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हे सर्व आमच्या समोरच घडत आहे, लोकांना दिल्लीत न येण्यासाठी किंवा दिल्ली सोडण्याचा सल्ला दिला जात आहे. राज्य सरकार जबाबदार आहे, लोकं त्यांच्या व शेजारील राज्यात मरत आहेत. आम्ही हे सहन करू शकत नाही. आपण प्रत्येक गोष्टीला सहजतेने घेत असल्याचे दिसत आहे.
 • दरम्यान, दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल केंद्र सरकारने रविवारी घेतली. त्यानंतर पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली. दिल्ली, हरियाणा आणि पंजाब सरकारांच्या बरोबरीने कॅबिनेट सचिव राजीव गऊबा प्रदूषणाच्या परिस्थितीवर दररोज देखरेख ठेवतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
 • दरम्यान, हवा प्रदूषण वाढत असल्याने दिल्ली परिक्षेत्रातील सर्व शाळा मंगळवापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
 • कापणीनंतर हवेत तरंगणारे पिकांचे अवशेष कण, कचरा जाळणे, बांधकामातून निर्माण होणारी धूळ, औद्योगिक वसाहतींतून हवेत सोडण्यात येणारे वायू आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण यातून उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांनी घेतला.
 • पंजाब, हरियाणा आणि दिल्ली प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. कॅबिनेट सचिव प्रदूषण परिस्थितीवर देखरेख ठेवतील, असे एका निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले. आपापल्या राज्यांतील जिल्ह्य़ानिहाय परिस्थितीवर २४ तास देखरेख ठेवण्याच्या सूचना या राज्यांच्या मुख्य सचिवांनाही देण्यात आल्या आहेत.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »