वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर

वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर
वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर

जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा

जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यामधील वैद्यकशास्त्रामधील नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
ऑक्सिजन सामावून घेण्याच्या पेशी प्रक्रियेचा उलगडा करणाऱ्या वैज्ञानिकांना यंदाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे.

विल्यम जी.केलिन, सर पीटर जे. रेटक्लिफ, ग्रेग सेमेन्झा याना संयुक्तरित्या २०१९ नोबेल जाहीर करण्यात आले आहे.


सोमवारी (7th Oct) स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये यंदाच्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली. अमिरेकेचे विलियम केलिन आणि ग्रेग सेमेन्जा आणि ब्रिटेनचे सर पीटर जे. रेटक्लिफ यांना संयुक्तरित्या नोबेल पुरस्कार दिला आहे.
मंगळवारी (8thOct) भौतिकशास्त्रामधील आणि १४ ऑक्टोबर रोजी इतर सहा क्षेत्रामधील नोबेल पुरस्काराची घोषणा होणार आहे.
ऑक्सिजन सामावून घेण्याच्या पेशी प्रक्रियेचा उलगडा या तिन्ही वैज्ञानिकांनी केला आहे. ऑक्सिजनच्या मात्रामुळे आपल्या सेलुलर मेटाबोलिज्म आणि शारीरिक हालचालीवर प्रभाव करतो. या वैज्ञानिकांच्या शोधामुळे एनिमिया, कँसर आणि अन्य आजारांवरील उपाय जलद होऊ लगाले.
नोबेल पुरस्काराचे स्वरूप:-
नोबेल पुरस्कार म्हणून सन्मानपत्र, सुवर्णपदक (१७५ ग्रॅम), रोख रक्कम ९ मिलियन स्विडिश क्राऊड म्हणजे १४ लाख अमेरिकन डॉलर अर्थात भारतीय ७ कोटी ७० लाख रुपये एवढी आहे. सुवर्णपदकाचे मूल्य लावले तर ते ५० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. काही पुरस्कारार्थींनी त्याची बोली लावून विक्री केली होती. त्यातून त्यांना कोट्यवधी रुपयांची प्राप्ती झाली होती.

वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक:-
वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे स्वीडनमधील कारोलिन्स्का इन्स्टिट्युटकडून दरवर्षी प्रदान करण्यात येणारे पारितोषिक आहे. आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात लिहिल्याप्रमाणे हे पारितोषिक १९०१ पासून दरवर्षी दिले जाते.  या शाखेतील पहिले पारितोषिक एमिल ऍडॉल्फ फोन बेह्रिंगला (जर्मनी) त्याच्या "रक्तपेशींद्वारे (प्लाझ्मा) उपचारपद्धतीसाठी, विशेषतः त्याच्या डिप्थेरियाविरुद्ध होणाऱ्या उपयोगासाठी, ज्याद्वारे वैद्यकशास्त्रातील एक नवे दालन खुले केले गेले व वैद्य व चिकित्सकांच्या हातात आजार आणि मृत्यूविरुद्ध लढण्यासाठी प्रभावी आयुध दिले गेले", देण्यात आले.
वैद्यकशास्त्रातील हे पारितोषिक रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, शांतता या इतर चार शाखांमधील पारितोषिकांबरोबर देण्यात येते. नोबेल फाउंडेशनद्वारे नियमन केली जाणारी ही पारितोषिके सहसा जगातील सर्वोच्च सन्मान समजली जातात.
आल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्युदिनी (डिसेंबर १०) हे पारितोषिक स्वीडनच्या राजाच्या हस्ते प्रदान केले जाते. त्यावेळी स्वीकारणाऱ्यास एक पदक, प्रमाणपत्र व बक्षिसरकमेची हमी दिली जाते.
नोबेल पदकाच्या समोरच्या बाजूस कारोलिन्स्का इन्स्टिट्युट येथील नोबेल सभेचे पदक असा मजकूर व आल्फ्रेड नोबेलचे चित्र असते तर मागच्या बाजूस ग्रीक इतिहासातील जिनियस आपल्या मांडीत उघडे पुस्तक ठेवून खडकातील वाहणारे पाणी घेउन एका आजारी मुलीची तहान भागवत आहे असे निरुपण असते.

प्रश्न : २०१८ मध्ये वॆद्यकशास्त्रीतील नोबेल कोणाला मिळाले होते?

 

 

 

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »