भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

जेम्स पीबल्स मिशेल मेयर व दिदियर क्वेलॉझ यांचा सन्मान

विश्वाची उत्क्रांती व बाह्य़ग्रहाच्या शोधासाठी नोबेल
महाविस्फोटापासून आतापर्यंत विश्वाची उत्क्रांत होत गेलेली अवस्था व विश्वातील पृथ्वीचे स्थान या विषयावरील सैद्धांतिक संशोधनासाठी जेम्स पीबल्स यांना तर बाह्य़ग्रहाच्या शोधासाठी मिशेल मेयर व दिदियर क्वेलॉझ यांना यंदाच्या वर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
विश्वाचा वेध घेणारे हे अतिशय क्रांतिकारी संशोधन असल्याचे नोबेल निवड समितीने या तिघांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले आहे.
विश्वाच्या उत्क्रांत अवस्थांचा अभ्यास पीबल्स यांनी केला असून मेयर व क्वेलॉझ यांनी १९९५ मध्ये दूरवर सूर्यासारख्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहाचा शोध लावला होता त्यानंतर आतापर्यंत चार हजारहून अधिक बाह्य़ग्रहांचा शोध लावण्यात यश आले आहे.
रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली असून नऊ दशलक्ष क्रोनर म्हणजे नऊ लाख १८ हजार अमेरिकी डॉलर्सच्या रकमेतील निम्मा वाटा जेम्स पीबल्स यांना मिळणार असून इतर दोघांना उर्वरित रक्कम सारखी वाटून दिली जाणार आहे.


जेम्स पीबल्स हे न्यूजर्सी येथील प्रिन्स्टन विद्यपीठात प्राध्यापक असून त्यांनी विशची उत्क्रांती व पृथ्वीचे विश्वातील स्थान यावर संशोधन केले.
महाविस्फोटानंतरच्या वैश्विक सूक्ष्म लहरी म्हणजे सीएमबीआरचे अस्तित्व त्यांनी पहिल्यांदा वर्तवले होते.
तुमची सर्वात मोठी कामगिरी कुठली असे विचारले असता ते म्हणाले की, असे काही सांगणे अवघड आहे. संपूर्ण आयुष्यभर केलेल्या कामाची ही पावती आहे. विश्वरचनाशास्त्रातील अनेक कोडय़ांचा उलगडा करण्यासाठी आपण यापुढेही सैद्धांतिक पातळीवर काम करीत राहू. विज्ञानाच्या प्रेमातून, कुतूहलातून तरुणांनी त्याकडे वळावे, पुरस्कार व मानसन्मान हा यातील एक भाग असला तरी तो तुमचा उद्देश असता कामा नये. विश्वाच्या उत्पत्तीबाबत आतापर्यंत बरीच माहिती मिळाली असली तरी अजून अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
मिशेल मेयर व दिदियर क्वेलोझ यांना पृथ्वीपासून पन्नास प्रकाशवर्षे दूर असलेल्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ५१ पेगासी बी या ग्रहाचा शोध लावल्याबद्दल नोबेल जाहीर करण्यात आले. या दोघांनी पहिल्या बाह्य़ग्रहाचा शोध लावला. हा ग्रह ज्या ताऱ्याभोवती फिरत आहे तो तारा वेगळ्या स्वरूपाचा असून तसे फार थोडे तारे आहेत, कारण त्यात हायड्रोजन अणूंचे संमीलन होऊन हेलियमचे अणू गाभ्याच्या ठिकाणी तयार होतात. अशा प्रकारच्या दुर्मीळ ताऱ्यात सूर्याचाही समावेश आहे.
अमेरिकन इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्स या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल मोलोनी यांनी म्हटले आहे की, विश्वाच्या मूलभूत स्वरूपाबाबतचे हे संशोधन क्रांतिकारी असून दूरस्थ बाग्रह शोधण्यातून विश्वरचनाशास्त्रात बाह्य़ग्रह विज्ञान ही नवीन शाखाच निर्माण झाली आहे. १९९५ मध्ये पहिला बाह्य़ग्रह शोधला गेला तेव्हा पृथ्वीचे विश्वातील स्थान काय आहे याबाबतचे आकलन बदलले आहे.
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार:-
भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक हे स्वीडनमधील कारोलिन्स्का इन्स्टिट्युटकडून दरवर्षी प्रदान करण्यात येणारे पारितोषिक आहे. आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात लिहिल्याप्रमाणे हे पारितोषिक १९०१ पासून दरवर्षी दिले जाते.
या शाखेतील पहिले पारितोषिक विल्हेल्म रॉन्टजेनला (जर्मनी) त्याच्या क्ष-किरणांचा शोध लावून मानवजातीची असाधारण सेवा केल्याबद्दल देण्यात आले.
हे पारितोषिक इतर चार शाखांमधील पारितोषिकांबरोबर देण्यात येते - रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता. नोबेल फाउंडेशनद्वारे नियमन केली जाणारी ही पारितोषिके सहसा जगातील सर्वोच्च सन्मान समजली जातात. आल्फ्रेड नोबेल च्या मृत्युदिवशी (डिसेंबर १०) हे पारितोषिक स्वीडनच्या राजाच्या हस्ते प्रदान केले जाते. त्यावेळी स्वीकारणाऱ्यास एक पदक, प्रमाणपत्र व बक्षिसरकमेची हमी दिली जाते.

भारतीय व्यकीला मिळालेले भौतिकशास्त्रातील नोबेल:-
सुब्रमण्यन चंद्रशेखर


सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर (१९१०–१९९५) हे एक भारतीय व अमेरिकन शास्त्रज्ञ होते. आधुनिक खगोलशास्त्रात त्यांचे काम मुलभूत आणि महत्त्वाचे मानले जाते.
ताऱ्यांच्या उत्पत्ती कशी होते ते चंद्रशेखरांनी शोधून काढले. या कामासाठी त्यांना १९८३ चे नोबेल पारितोषिक मिळाले. शिवाय त्यांना पद्मविभूषण, ब्रूस पदक व इतर अनेक पारितोषिके मिळाली.

प्रश्न:- भौतिक शास्त्रातील नोबेलविषयी अयोग्य असणारे विधान/विधाने निवडा
अ. भौतिक शास्त्रातील पहिले पारितोषिक विल्हेल्म रॉन्टजेनला यांना देण्यात आले होते.
ब. २०१८ मध्ये पहिल्यांदाच एका महिलेला या क्षेत्रातील नोबेल दिला असून डोना स्ट्रीक्लंड असे त्यांचे नाव आहे.
क. भारतीय अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ सुब्रमण्यन चंद्रशेखर यांना १९८३ चा भौतिकशास्त्रातील नोबेल देऊन गौरवण्यात आले होते.
१ फक्त अ आणि ब
२ फक्त अ आणि क
३ फक्त क
४ एकही नाही

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »