पकजचे २२वे जगज्जेतेपद

पकजचे २२वे जगज्जेतेपद
पकजचे २२वे जगज्जेतेपद

आयबीएसएफ जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद

  • भारताचा सर्वात सातत्यपूर्ण खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकज अडवाणीने रविवारी आपल्या खात्यात २२व्या जगज्जेतेपदाची भर घातली. 
  • आयबीएसएफ जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या १५०-अप प्रकारात अडवाणीने जगज्जेतेपद पटकावले. 
  • २०१४ मध्ये व्यावसायिक स्तरावर पुनरागमन केल्यानंतर ३४ वर्षीय अडवाणीने प्रत्येक वर्षी जगज्जेतेपदाचा चषक भारतात आणला आहे. 
  • बिलियर्ड्सच्या या मर्यादित प्रकारात पंकजचे हे गेल्या सहा वर्षांतील पाचवे जगज्जेतेपद ठरले. 
  • गेल्या वर्षीप्रमाणेच पंकज अडवाणीने म्यानमारच्या नाय थ्वाय ओ याचा अंतिम फेरीत ६-२ (१५०-४, १५१-६६, १५०-५०, ७-१५०, १५१-६९, १५०-०, १३३-१५०, १५०-७५) असा पराभव केला.
  • पंकजने १४५, ८९ आणि १२७ गुणांचे ब्रेक लगावत सुरुवातीलाच ३-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर थ्वायने एक फ्रेम जिंकून सामन्यात रंगत आणली. पण पंकजने पुढील चारपैकी तीन फ्रेम जिंकून विजेतेपद संपादन केले.
  • २००३मध्ये पहिले जगज्जेतेपद पटकावल्यानंतर पंकज अडवाणीची विजयी घोडदौड सुरूच आहे. या खेळात सर्वाधिक जगज्जेतेपद पटकावणारा तो जगातील एकमेव स्नूकरपटू ठरला आहे.
  • बिलियर्ड्सचा हा प्रकार बेभरवशी मानला जात असून सलग चार वर्षे आणि गेल्या सहा वर्षांतील पाचवे जगज्जेतेपद पटकावताना आनंद होत आहे. 
  • प्रत्येक वर्षी मी जेव्हा जागतिक स्पर्धेत सहभागी होतो, त्या प्रत्येक वेळी माझा आत्मविश्वास गगनाला भिडलेला असतो. विजेतेपदाची भूक आणि माझे खडतर परिश्रम याचेच हे फळ म्हणावे लागेल. -– पंकज अडवाणी

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »