प्लास्टिकबंदीसाठी भारताने काय केले

प्लास्टिकबंदीसाठी भारताने काय केले
प्लास्टिकबंदीसाठी भारताने काय केले

प्लास्टिकचा वापर आणि निर्मितीवर अंकुश

प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी देशभरातून विविध प्रयत्न सुरू आहेत. एकदाच वापर करता येण्याजोग्या प्लास्टिकवर सरकारने घातलेली बंदी हा या प्रयत्नाचाच एक भाग आहे. प्लास्टिकबंदीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करण्यात आलेल्या विविध गोष्टींचा घेतलेला हा आढावा.
प्लास्टिकचा वापर आणि निर्मितीवर अंकुश:-
1.    पन्नास मायक्रॉन्सपेक्षा पातळ प्लास्टिक कॅरी बॅगवर बंदी.
2.    गुटखा, पानमसाला, तंबाखू इत्यादींच्या पॅकिंगसाठी प्लास्टिक वापरावर बंदी.
सर्व राज्यांमध्ये वरील दोन्ही नियमांची अंमलबजावणी

  • २०२२पर्यंत एकदाच वापर करता येण्याजोग्या प्लास्टिकवर पूर्णत: बंदी घालण्याचे देशाचे ध्येय. सर्व राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रमुख कार्यालयांमध्ये अशा प्रकारच्या प्लास्टिक उत्पादनांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. गंगेच्या काठावर वसलेली ११८ गावे, वीस राज्यांच्या राजधानीची शहरे आणि त्यासह ४६ शहरांच्या आयुक्तांनी आपल्या शहरांमध्ये पन्नास मायक्रॉन्सपेक्षा पातळ प्लास्टिक कॅरीबॅगची निर्मिती आणि वापर करण्यावर बंदी घातली आहे.
  • भारतीय मानकांच्या (बीआयएस) नियमानुसार ५ मिलिमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यास असलेल्या छोट्या कणांपासून ज्या वस्तूंची निर्मिती केली जाते, त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. प्रसाधनगृहांमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंचा यात समावेश आहे.
  • कॅरीबॅगसह अन्य काही प्लास्टिक वस्तूंवरील बंदीचे नियम २१ राज्यांनी अत्यंत कडक केले आहेत.

देशात निर्माण होणारा प्लास्टिक कचरा:-

  • २५,९४० टन प्रतिदिन
  • ९५ लाख टन प्रतिवर्ष

(स्रोत : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ)
प्लास्टिकच्या आयातीवर बंदी:-

  • मार्च महिन्यात प्लास्टिकच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे; तसेच व्यापाऱ्यांना जुना साठा बाहेर काढण्यासाठी सहा महिन्यांची मुद देण्यात आली होती. ३१ ऑगस्टपर्यंत ही मुदत होती.

प्लास्टिकची आयात (आकडेवारी टनांमध्ये):-

  1. वर्ष २०१७ : १,५५,७८७
  2. वर्ष २०१८ : १,८१,६३८
  3. वर्ष २०१९ : २,१८,७४७
  • जगात २०१५ मध्ये निर्माण झालेल्या एकूण प्लास्टिकच्या कचऱ्यापैकी ४७ टक्के कचरा पॅकेजिंग मटेरियलचा होता. त्यापैकी निम्म्याहून अधिक कचऱ्याचे उगमस्थान अमेरिका होते. चीन प्लास्टिक पॅकेजिंग पदार्थांचा सर्वांत मोठा उत्पादक, तर अमेरिका प्लास्टिक कचऱ्याचा सर्वांत मोठा निर्माता आहे.

२०५० पर्यंत प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण १२ अब्ज टनांवर जाणार
७९ टक्के : भूमिगत किंवा पर्यावरणात विविध ठिकाणी विखुरलेल्या प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण
१२ टक्के : जाळण्यात आलेला प्लास्टिक कचरा
९ टक्के : पुनर्प्रकिया करण्यात आलेला प्लास्टिक कचरा
(स्रोत : लोकसभा आणि संयु्क्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम)

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »