भयंकर प्रदूषणामुळं भारतीयांचं आयुष्य ७ वर्षांनी घटलं

भयंकर प्रदूषणामुळं भारतीयांचं आयुष्य ७ वर्षांनी घटलं
भयंकर प्रदूषणामुळं भारतीयांचं आयुष्य ७ वर्षांनी घटलं

एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट अहवाल

  • वाढत्या प्रदूषणाचा विळखा गंगा नदीच्या आसपासच्या प्रदेशाला वेगाने बसत आहे. यामुळे गंगेच्या पठारावर राहणाऱ्या भारतीयांचे आयुर्मान सात वर्षांनी घटले असल्याचा धक्कादायक निष्कर्ष अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने काढला आहे.
  • १९९८ ते २०१६ या १८ वर्षांतील प्रदूषणाचा अभ्यास करून या संस्थेने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे.
  • गंगा स्वच्छता मोहिमेला सरकार प्राधान्य देत असतानाच या नदीप्रदेशातच प्रदूषणाची पातळी वाढलेली असणे ही बाब चिंताजनक आहे.
  • उत्तर भारतातील गंगेच्या पठारावरील प्रदूषण हे उर्वरित देशातील प्रदूषणापेक्षा तिप्पट धोकादायक असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
  • गंगा पठाराची व्याप्ती सात राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत आहे. यामध्ये बिहार, चंदिगड, दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होतो.
  • या राज्यांमध्ये देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ४८ कोटींहून किंवा ४० टक्क्यांहून अधिक जनता राहते.
  • १९९८ ते २०१६ या काळात वरील प्रदेशातील हवेत प्रदूषक कणांची पातळी उर्वरित देशातील प्रदूषक कणांपेक्षा दुप्पट झाली, असे या इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या हवेच्या दर्जा निर्देशांकाच्या विश्लेषणात म्हटले आहे. २०१६पर्यंत या प्रदेशातील प्रदूषणात ७२ टक्के वाढ झाली आणि त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांचे आयुर्मान ३.४ ते ७.१ वर्षांनी घटले.

आशादायी चित्र:-

  • इन्स्टिट्यूटच्या अहवालात हेदेखील नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत ठरवेले लक्ष्य गाठण्यात भारत यशस्वी झाल्यास तसेच स्थायी स्वरूपात २५ टक्के प्रदूषण कमी करण्यातही यश आल्यास हवेचा दर्जा सुधारले. याचा परिणाम म्हणून भारतीयांचे सरासरी आयुर्मान १.३ वर्षांनी वाढेल.

ओपिनिअयन पोल
प्रदूषण कमी करण्यासाठी जागतिक, राष्ट्रीय, वैयक्तिक पातळीवर काय करणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते?? कारण फक्त अहवाल वाचून आणि हळहळ व्यक्त करून प्रदूषण कमी होणार नाही आपणच पुढे होऊन यासाठी कृती करणे गरजेचे आहे.
थोडस पुढे जाऊन सांगावेसे वाटते, एक कल्पना करा तुम्हाला किती ऑक्सिजन घ्यायचा आणि किती प्रमाणात कार्बन डायऑक्सइड सोडायचा याचे निकष ठरवून देण्याची वेळ आली, त्यावर कर ही लावण्याची वेळ आली. काय वाटेल?? मला ठाउक आहे हे वाचायला, ऐकायला खूपच Weird आहे, पण फक्त विचार तरी करा. बघा काय वाटते.
आपलं कास आहे जी वस्तू विकत मिळते म्हणजे पैसे मोजुन त्यालाच जास्त किंमत देतो आपण (आजकाल फक्त पैश्यालाच जास्त मूल्य आहे) उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही मिनरल वॉटर विकत घेता तेव्हा ते किती जपून वापरता, घरी येणार पाणी तितक्या काळजीपूर्वक वापरता का? थोडस अंतर्मुख होऊन स्वतःलाच उत्तर देऊ..!!

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »