पत्रकार रविश कुमार यांना मानाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

पत्रकार रविश कुमार यांना मानाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर
पत्रकार रविश कुमार यांना मानाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

आशिया खंडातील नोबल पुरस्कार

एनडीटीव्हीचे पत्रकार रविश कुमार यांना मानाचा समजला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील कामासाठी रविश कुमार यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. आशिया खंडातील नोबल पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुरस्कार विजेत्यांच्या नावांची आज रॅमन मॅगसेसे पुरस्कार फाउंडेशनने घोषणा केली. रवीश कुमार यांच्याबरोबर म्यानमारमधील पत्रकार को स्वी वीन, थायलंडच्या अंगखाना नेलापाजीत, फिलिपिन्सच्या रेम्युंडो पुतांजे सायाबयाब आणि दक्षिण कोरियामधील किम जाँग की यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘रवीश कुमार यांची या पुरस्कारासाठी निवड करताना निवड समितीने त्यांच्यातील काही खास गुणांचा गौरव केला आहे. आपल्या कामाप्रती असणारी त्यांची प्रतिबद्धता, उच्च दर्जाची आणि पत्रकारिता करता असणारी नैतिकता, त्यांचे सत्यासोबत उभी राहण्याची हिंमत, सचोटी आणि स्वातंत्र्य भूमिका घेणे हे गुण कौतुकास्पद आहेत. सत्तेला शांतपणे प्रश्न विचारत पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा हा सत्कार आहे’ मॅगसेसेने म्हटले आहे.

मॅगसेसे पुरस्कार:-

आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. या पुरस्काराची सुरूवात न्यूयॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली.
प्रश्स्तिपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे

आत्तापर्यंत भारतीयांना मिळालेले मॅगसेसे पुरस्कार 

यातले काही महत्त्वाचे व्यक्ती तुम्ही लक्षात ठेवू शकता
भारत वाटवाणी (2018)
सोनम वांगचुक (2018)
अमिताभ चौधरी
अरविंद केजरीवाल (२००६)
अरुण शौरी
अंशू गुप्ता (२०१५)
आर.के. लक्ष्मण
इला भट्ट
कमलादेवी चटोपाध्याय
किरण बेदी
गौर किशोर घोष
चांदी प्रसाद भट्ट
चिंतामणराव देशमुख
जयप्रकाश नारायण
जॉकिन अर्पूथाम
बूबली जॉर्ज व्हर्गीस
टी.एन. शेषन
त्रिभुवनदास पटेल
दीप जोशी
प्रकाश आमटे
पांडुरंगशास्त्री आठवले
बाबा आमटे
मणिभाई देसाई
मदर तेरेसा
मंदाकिनी आमटे
मॅबल आरोळे
महाश्वेता देवी
महेशचंद्र मेहता
रजनीकांत आरोळे
रविशंकर
राजेंद्र सिंग
ललिता मिश्रा (२०११)
लक्ष्मीचंद जैन
जेम्स मायकेल लिंगदोह
विनोबा भावे
शंभू मित्र
व्ही.शांताराम
शांता सिन्हा
संजीव चतुर्वेदी (२०१५)
सत्यजित रे
संदीप पांडे
पी.साईनाथ
एम.एस. सुब्बलक्ष्मी
के.व्ही. सुब्बाना
प्रमोद करण सेठी
एम.एस. स्वामिनाथन
हरीश पांडे (२०११)

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »