लक्ष्मीविलास बँक वरही रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

लक्ष्मीविलास बँक वरही रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
लक्ष्मीविलास बँक वरही रिझर्व्ह बँकेचे निर्बंध

खासगी क्षेत्रातील लक्ष्मीविलास बँकेवर (एलव्हीबी) आर्थिक निर्बंध (पीसीए)

  • 'पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके'चा (पीएमसी) गोंधळ सुरू असतानाच आता रिझर्व्ह बँकेने आर्थिक अनियमिततेचे कारण देऊन खासगी क्षेत्रातील लक्ष्मीविलास बँकेवरही (एलव्हीबी) आर्थिक निर्बंध (पीसीए) घातले आहेत.
  • 'लक्ष्मीविलास बँके'वर कारवाई करताना रिझर्व्ह बँकेने मोठ्या प्रमाणातील थकीत कर्जे, कोणत्याही आर्थिक संकटाशी सामना करण्याची कुवत नसणे आणि सलग दोन वर्षे 'अॅसेट क्वालिटी'त झालेली घसरण ही तीन कारणे पुढे केली आहेत.
  • त्यामुळे आता नव्याने कर्जे देणे, लाभांश जाहीर करणे आणि शाखांचा विस्तार करण्यात लक्ष्मीविलास बँकेला अडचणी येणार आहेत.
  • एकीकडे रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक निर्बंध घालण्यात येत असतानाच दुसरीकडे दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने निधीच्या गैरव्यवहारप्रकरणी 'एलव्हीबी'च्या संचालक
  • मंडळाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
  • दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेवर ७९० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. वित्तीय क्षेत्रातील कंपनी 'रेलिगेअर फिनक्वेस्ट'च्या तक्रारीनुसार दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बँकेने आमच्या ७९० कोटी रुपयांच्या मुदतठेवीत गैरव्यवहार केल्याचे 'रेलिगेअर'ने तक्रारीत नमूद केले आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »