देशात महागाई वाढली उद्योगधद्यांची वाढ मंदावली

देशात महागाई वाढली उद्योगधद्यांची वाढ मंदावली
देशात महागाई वाढली उद्योगधद्यांची वाढ मंदावली

मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील निराशाजनक कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादन वाढीच्या दरात ही घसरण

  • देशाच्या खिळखिळ्या झालेल्या अर्थव्यव्यवस्थेसाठी औद्योगिक क्षेत्रातून आणखी एक वाईट बातमी येऊन धडकली आहे. जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादन वाढीच्या दरात घट होऊन ती ४.३ टक्क्यांवर आली. गेल्या वर्षी जुलै महिन्यात हीच घट ६.५ टक्क्यांवर होती. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील निराशाजनक कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादन वाढीच्या दरात ही घसरण झाली असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
  • एकीकडे औद्योगिक उत्पादन वाढीच्या दरात घसरण झाली असताना दुसरीकडे खाद्यपदार्थांच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे किरकोळ महागाईने नवा स्तर गाठला आहे. ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई ३.२१ टक्क्यांवर पोहोचली. या महागाईचा हा दहा महिन्यांतील उच्चांक आहे. परंतु, महागाई दराचा हा आकडा अजूनही रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या लक्ष्याच्या चौकटीतच आहे. सरकारने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे.
  • केंद्र सरकारच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये सीपीआय आधारित खाद्य चलनवाढ २.९९ टक्के होती, ही जुलै महिन्यांत २.३६ टक्के होती. ऑगस्ट महिन्यांत किरकोळ महागाईचा दर ३.६९ टक्के होता. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला महागाईचा दर सुमारे ४ टक्क्यांच्या चौकटीत ठेवण्यास सांगितले आहे.
     

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »