उत्खननात सापडले २२७ मुलांचे अवशेष

उत्खननात सापडले २२७ मुलांचे अवशेष
उत्खननात सापडले २२७ मुलांचे अवशेष

प्राचीन चिमू संस्कृतीच्या काळात बळी दिलेल्या २२७ मुलांचे शरीराचे अवशेष

 • प्राचीन चिमू संस्कृतीच्या काळात बळी दिलेल्या २२७ मुलांचे शरीराचे अवशेष पेरू येथे पुरातत्व विभागाला सापडले आहेत. हुआंचाको येथे बळी दिलेल्या ठिकाणी गेल्यावर्षीपासून उत्खनन सुरू आहे. हुआंचाको लीमाच्या उत्तरेला एक पर्यटन शहर म्हणून प्रसिद्ध आहे. हुआंचाको येथे चिमू संस्कृतीच्या काळात बळी देण्याची प्रथा होती.
 • ज्या मुलांचा बळी देण्यात आला होता त्यांच्याच शरीराचे अवशेष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. चिमू संस्कृतीत देवाला प्रसन्न करण्यासाठी जे पूजाविधी केले जायचे त्यात मुलांचा बळी देण्याची प्रथा होती. या मुलांचे वय ४ ते १४ वर्षे यादरम्यानचे होते, अशी माहिती पुरातत्व तज्ञ फेरन कॅस्टिलो यांनी 'एएफपी'ला दिली. त्याकाळी 'अल नीनो' नंतर मुलांचा बळी देण्यात आले असावे. तेव्हा पाऊसही असावा, असे उपलब्ध पुराव्यांवरून दिसत असल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले. 
 • येथे बरेच मृतदेह समुद्राच्या दिशेने तोंड करून दफन करण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी केस तसेच काहीअंशी मांसही आढळून आले आहे. ही सारी स्थिती लक्षात घेता नैसर्गिक आपत्ती आणि नरबळी यांचं कनेक्शन असल्याचंही स्पष्ट होत आहे. जिथे उत्खनन सुरू आहे तिथली दृष्य लक्ष विचलित करणारी आहेत. हे उत्खनन यापुढेही सुरूच राहणार असून आणखीही मुलांचे मृतदेह आढळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

अल नीनो:-

 • अल नीनोच्या प्रभावामुळे प्रशांत महासागरात मोठ्या प्रमाणात वातावरण बदल होतो.
 • उष्णता वाढून हवेची दिशा आणि वेगातही बदल होतो. 
 • परिणामी हवामानाचं पूर्ण चक्रच बिघडून जातं. या स्थितीत काही भागांत दुष्काळी स्थिती निर्माण होतो तर काही भागांत पूरस्थिती ओढवते. 

पेरू देशाविषयी:-

 • पेरूचे प्रजासत्ताक हा दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील प्रशांत महासागराच्या किनार्‍यावरील एक देश आहे. पेरूच्या उत्तरेला इक्वेडोर व कोलंबिया, पूर्वेला ब्राझिल, आग्नेयेला बोलिव्हिया, दक्षिणेला चिली हे देश तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहे.
 • प्रागैतिहासिक काळापासून ह्या प्रदेशावर स्थानिक आदिवासी वसाहती व इन्का साम्राज्याचे अधिपत्य होते.
 • १६ व्या शतकात क्रिस्तोफर कोलंबसने लॅटिन अमेरिकेचा शोध लावल्यानंतर स्पेनने इतर दक्षिण अमेरिकन प्रदेशांप्रमाणे येथे आपली वसाहत स्थापन केली.
 • १८२१ साली पेरूला स्वातंत्र्य मिळाले.
 • सध्या पेरू हा एक लोकशाहीवादी विकसनशील देश असून येथील लोकसंख्या सुमारे २.९५ कोटी इतकी आहे. 
 • येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेती, मासेमारी, खाणकाम इत्यादी उद्योगांवर अवलंबून आहे.
   

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »