हिंदी महासागराचे वाढते तापमान चिंताजनक

हिंदी महासागराचे वाढते तापमान चिंताजनक
हिंदी महासागराचे वाढते तापमान चिंताजनक

नेचर क्लायमेट चेंज नियतकालिकात संशोधन प्रसिद्ध

हिंदी महासागराचे वाढते तापमान चिंताजनक:-

 • हिंदी महासागराचे तापमान वाढत असून त्याचा जागतिक हवामानावर मोठा प्रभाव पडत असल्याचे ताज्या अहवालात म्हटले आहे.
 • हिंदी महासागराचे वाढते तापमान जागतिक तापमानवाढीच्या शृंखलेतील एक महत्त्वाचा दुवा आहे. जगाच्या बदलाच्या पाऊलखुणा या महासागरात सापडतात.
 • पाण्याचा उबदारपणा वाढविण्यासाठी अटलांटिक मेरिडोनियल ओव्हरटर्निंग सर्क्युलेशन (एएमओसी) अर्थात अटलांटिक दक्षिणी जाणारे वितरण कारणीभूत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
 • ही पृथ्वीवरील सर्वांत मोठी जलवितरण यंत्रणा असून त्याद्वारे गरम पाणी जगातील समुद्राच्या सर्वांत थंड पाण्याकडे सरकते.
 • या प्रक्रियेचा परिणाम, उष्ण कटिबंधातील खारे पाणी जगाच्या उत्तर भागाकडे पाठविण्यात होतो. त्यात पश्चिम युरोपचाही समावेश आहे. युरोपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. ही प्रक्रिया स्थिरावली नाही तर, युरोपातील समुद्राचे तापमान आणखी थंड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 • 'नेचर क्लायमेट चेंज' या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

संशोधन नेमके काय आहे?:-

 • हिंदी महासागराचे तापमान हे जागतिक हवामान बदलाच्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहे का याचा नेमका शोध घेणे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे (सॅन दिएगो) सिनेंग हू यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन सुरू आहे.
 • येल युनिव्हर्सिटीचे अॅलेक्सी फेडरोव्ह प्रकल्पाचे सहसंशोधक आहेत. 'एएमओसी'चा गेल्या १५ वर्षांपासूनचा तपशील संकलित करण्यात आला आहे.
 • त्यानुसार ही प्रक्रिया स्थिर आहे की, सावकाश होत आहे हे पाहिले जाणार आहे. त्याशिवाय, ती तात्कालिक आहे की, दीर्घकालीन यावरही प्रकाश टाकला जाणार आहे. या प्रक्रियेचे स्थिरीकरण हे काळजी करायला लावणारे आहे. 

तापमान वाढीवर साऱ्यांचे लक्ष:-

 • हिंदी महासागराचे वाढते तापमान जागतिक तापमानवाढीच्या शृंखलेतील एक महत्त्वाचा दुवा आहे. जगाच्या बदलाच्या पाऊलखुणा या महासागरात सापडतात. 
 • १५००० ते १७००० वर्षांपूर्वी 'एएमओसी' क्षीण झाले होते. त्याचे जगावर मोठे परिणाम होतात, त्यामुळे नेमके लक्ष ठेवणे गरजेचे आहे. युरोपात कडकडीत थंडी वाढणे, आफ्रिकेत पावसाचा पट्टा तयार होणे यांसारखे प्रकार त्यातून होऊ शकतात. 
 • हवामानाच्या संकटावर उपाययोजना करण्यासाठी आपण मागे पडतो आहोत. 'पॅरिस करारा'च्या अनुषंगाने ठरलेल्या ध्येयांपासूनही आपण खूप दूर आहोत.
 • सर्वच देशांनी ग्रीनहाउस वायूउत्सर्जन, पृथ्वीचे ‌वाढते तापमान आदींबाबत काळजी घेण्याची गरज आहे.

जागतिक तापमान वाढीबद्दल कोणताही संदर्भ हवा असल्यास ब्लॉगच्या माध्यमातून सर्व आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली आहे त्यातून तुमच्या CLIMATE CHANGE बद्दलच्या सर्व संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल. त्यासाठी खाली दिलेली PDF DOUNLOAD  करू शकता .

DOWNLOAD THE PDF

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »