रोहित शर्मानं विराट धोनीलाही टाकले मागे

रोहित शर्मानं विराट धोनीलाही टाकले मागे
रोहित शर्मानं विराट धोनीलाही टाकले मागे

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये गाठला मोठा टप्पा

  • भारताचा सलामीवीर आणि टी-२० क्रिकेट संघाचा बदली कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सामन्यात अवघ्या नऊ धावा करून बाद झाला. मात्र, या नऊ धावांसह त्यानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये मोठा टप्पा गाठला. त्यानं माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. रोहितनं सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळण्याच्या बाबतीत धोनीला, तर सर्वाधिक धावांच्या बाबतीत विराटला मागे टाकलं.

धोनीला टाकलं मागं:-

  • दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये उतरताच रोहित शर्मानं महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले. सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याच्या बाबतीत आता रोहित धोनीच्याही पुढे आहे. रोहितच्या नावावर भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळण्याच्या विक्रम झाला आहे.

टी-२० मालिकेत कर्णधारपदाची धुरा:-

  • बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. रोहित आपल्या कारकिर्दीतील ९९वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. महेंद्रसिंग धोनीनं ९८ टी-२० सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. आता तो सर्वाधिक टी-२० सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

मलिक आणि आफ्रिदी आघाडीवर:-

  • २००७ साली वर्ल्ड टी-२०मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रोहित याबाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा शोएब मलिक १११ सामन्यांसह पहिल्या, तर शाहिद आफ्रिदी ९९ सामन्यांसह दुसऱ्या स्थानी आहे.

विराटचा विक्रम मोडला:-

  • बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अवघ्या सहा चेंडूंत नऊ धावांची खेळी करून रोहितनं विराट कोहलीचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत त्यानं विराटला मागे टाकलं. विराटनं ७२ सामन्यांत २४५० धावा केल्या आहेत. तर रोहितनं ९९ सामन्यांत २४५२ धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर २२ अर्धशतके आहेत. तर रोहितने आतापर्यंत ४ शतके आणि १७ अर्धशतके ठोकली आहेत.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »