जपानचे टोकियो जगात सर्वात सुरक्षित शहर

जपानचे टोकियो जगात सर्वात सुरक्षित शहर
जपानचे टोकियो जगात सर्वात सुरक्षित शहर

इकॉनॉमिक्‍स या साप्ताहिकाच्या चमूने केले सर्वेक्षण

जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. या यादीत जपानच्या टोकियो शहराने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर या यादीत देशाची राजधानी दिल्लीला चक्‍क 53 वा क्रमांक मिळाला आहे. 
इकॉनॉमिक्‍स या साप्ताहिकाच्या चमूने याचे सर्वेक्षण केले असून सर्वेक्षणात बऱ्याच शहरांना आपला या अगोदरचा क्रमांक गमवावा लागला आहे. 
यात हॉंगकॉंग शहराची 20 क्रमांकावर घसरण झाल्याचे पहायला मिळाले. तर वॉशिंग्टन शहराने आपली सुरक्षेची पातळी वाढवून 10 व्या क्रमांकावर मजल मारली आहे.
जगातील पाच खंडातील 60 शहरांचा या यादीत समोवश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणासाठी शहरातील डिजीटल आणि अत्याधुनिक सुविधा, आत्पकालिन यंत्रणा आणि वैयक्‍तिक सुरक्षा यांचा विचार करण्यात आला होता. 2017 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात हॉंगकॉंगचे स्थान 9 व्या क्रमांकावर होते परंतू, मागील तीन वर्षापासून हॉंगकॉंगचा सुरक्षास्तर ढासळत जात असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. 
पाकिस्तानमधील कराचीने या यादीत 57 वे क्रमांक पटाकवले आहे. तर दिल्ली 53 व्या क्रमांकावर आहे दिल्लीच्या मानाने कराची एवढे सुरक्षित शहर नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर बांग्लादेशची राजधानी ढाका या शहराला 56 वा क्रमांक मिळाला आहे. दरम्यान, आशिया आणि पॅसिफिक खंडात म्हणाव्या तितक्‍या डिजीटल सुविधा अजूनही नसल्याचे इकॉनॉमिक्‍स साप्ताहिकाच्या चमूने म्हटले आहे.

  • निर्देशांक जारी करणारी संस्था - The Economist Intelligence Unit
  • 5 खंडातील एकूण 60 देशांच्या शहरांचा अभ्यास
  • जगातील सर्वात सुरक्षित शहर - टोकियो (निर्देशांकात प्रथम स्थानी)
  • द्वितीय स्थान - सिंगापूर
  • तृतीय स्थान - ओसाका
  • चौथ्या स्थानी - अँम्सटरडॅम
  • 5 व्या स्थानी - सिडनी
  • भारतातील मुंबई - 45 व्या स्थानी
  • दिल्ली - 53 व्या स्थानी

4 निकषांच्या आधारे निर्देशांक काढला जातो:-

1. डिजिटल सुरक्षा

2. पायाभूत संरचनांची सुरक्षितता

3. आरोग्य सुरक्षितता

4. व्यक्तिगत संरक्षण

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »