स्मृती मंथनाचा नवीन विक्रम विराटलाही टाकलं मागे

स्मृती मंथनाचा नवीन विक्रम विराटलाही टाकलं मागे
स्मृती मंथनाचा नवीन विक्रम विराटलाही टाकलं मागे

सर्वात वेगवान २००० धावा करणारी मंधाना जगातील तिसरी फलंदाज

 • भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज स्मृती मंधानानं कारकिर्दीतील ५१व्या वनडेमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
 • वनडेमध्ये सर्वाधिक वेगानं २००० धावा करणारी भारतीय महिला फलंदाज ठरली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराटलाही तिनं याबाबतीत मागे टाकलं आहे.
 • स्मृतीनं हा विक्रम वेस्ट इंडीजविरुद्धच्या लढतीत केला आहे.
 • स्मृती मंधानानं वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात ७४ धावांची तडाखेबंद खेळी केली.
 • तिनं या डावात युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिच्यासोबत पहिल्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी रचली. जायबंदी असल्यामुळं पहिल्या दोन सामन्यांमध्ये ती खेळली नव्हती.
 • मंधानानं तिसऱ्या सामन्यात ६३ चेंडूंमध्ये ७४ धावा केल्या.
 • तर रॉड्रिग्जनं ९२ चेंडूंमध्ये ६९ धावा केल्या. भारतानं हा सामना सहा विकेट राखून जिंकला.
 • २३ वर्षीय मंधानानं ५१ डावांमध्ये २००० धावा केल्या. सर्वात वेगवान २००० धावा करणारी मंधाना जगातील तिसरी फलंदाज ठरली आहे.
 • ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क आणि मेग लेनिंग ही अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत.
 • मंधानानं ५१ वनडे सामन्यांत ४३.०८ च्या सरासरीनं २०२५ धावा केल्या आहेत. त्यात चार शतके आणि १७ अर्धशतके आहेत.
 • टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनच्या नावावरही सर्वात जलद २००० धावा करण्याचा विक्रम आहे. त्यानं ४८ डावांमध्ये हा विक्रम प्रस्थापित केला आहे. विराट कोहलीही दोन डावांनी पिछाडीवर आहे. त्यानं २००० धावा ५३ डावांमध्ये केल्या होत्या. पुरूष क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम अमलाच्या नावावर आहे.
 • त्यानं ४० डावांमध्ये हा विक्रम केला आहे. महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा बेंलिडा (४१) डाव, आणि लेनिंग (४५ डाव) हिने केल्या आहेत.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »