सौदी महिलांवरील प्रवासनिर्बंध शिथिल

सौदी महिलांवरील प्रवासनिर्बंध शिथिल
सौदी महिलांवरील प्रवासनिर्बंध शिथिल

सौदी अरेबियात एक ऐतिहासिक निर्णय

  • सौदी अरेबियात एका ऐतिहासिक निर्णयाच्या अंमलबजावणीला मंगळवारपासून सुरुवात झाली. 
  • २१ वर्षांहून अधिक वयाच्या महिलांना आता त्यांच्या पुरुष 'पालका'च्या परवानगीशिवाय पासपोर्ट मिळणार असून त्यांना त्यांच्या परवानगीशिवाय परदेशी जाता येणार आहे. 
  • स्त्रियांना पुरुष 'पालकत्वा'च्या जोखडातून मुक्त करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय या महिन्याच्या प्रारंभी घेण्यात आला होता. 
  • पासपोर्ट विभागाकडे २१ वर्षांवरील महिलांकडून नवा पासपोर्ट आणि पासपोर्ट नूतनीकरणाचे तसेच, विनापरवानगी परदेशी जाण्यासाठी अर्ज आल्याचे सौदी अरेबियाच्या पासपोर्ट विभागाने ट्विटरवर म्हटले आहे. 
  • याआधी सौदीतील महिलांना यासाठी त्यांच्या पुरुष पालकांकडून-म्हणजे पती, वडील किंवा अन्य पुरुष नातेवाईकांकडून परवानगी घेणे गरजेचे होते. गेल्या वर्षी महिलांना गाडी चालविण्याची मुभा देण्यात आली होती. 
  • त्यानंतर या महिन्यात सौदी महिलांना मुलांचा जन्म, लग्न किंवा घटस्फोटासाठी अधिकृतरीत्या नोंदणी करण्याचा हक्क प्रदान करण्यात आला होता. तसेच, अल्पवयीन मुलांसाठी पुरुषांबरोबरच महिलेलाही मुलाचे पालक म्हणून नोंद करण्याचा हक्क देण्यात आला होता. 
  • या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात आले होते. मात्र काही कट्टरवाद्यांनी पालकत्वाचे कायदे बदलण्याच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली होती.

सौदी अरेबिया:-

  • सौदी अरेबियाचे राजतंत्र हा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा अरब देश आहे. सौदी अरेबियाच्या उत्तरेला जॉर्डन व इराक, ईशान्येला कुवेत, पूर्वेला कतार, बहारीन, संयुक्त अरब अमिराती व ओमान, दक्षिणेला येमेन हे देश व पूर्वेला पर्शियन आखात व पश्चिमेला लाल समुद्र आहेत. 
  • रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे तर मक्का व मदिना ही इस्लाम धर्मातील दोन सर्वात पवित्र स्थळे सौदी अरेबियामध्ये आहेत. सौदीचे सरकार पूर्णपणे राजेशाही स्वरूपाचे असून येथे शारिया कायदा चालतो. सलमान (Salman bin Abdulaziz Al Saud) हे सौदीचे सध्याचे राजे आहेत.
  • सौदी अरेबिया देशामध्ये जगातील सर्वाधिक खनिज तेलाचे साठे (एकुण जगाच्या १९.८ टक्के) आहेत. जगात सर्वात मोठ्या प्रमाणावर तेलाची निर्यात करणार्‍या सौदीची ९० टक्के व सौदी सरकारची ७६ टक्के अर्थव्यवस्था ह्या निर्यातीवर अवलंबून आहे. 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »