एस 400 लवकर मिळण्यासाठी भारत आग्रही

एस 400 लवकर मिळण्यासाठी भारत आग्रही
एस 400 लवकर मिळण्यासाठी भारत आग्रही

भारताने रशियाला आतापर्यंत यासाठी सहा हजार कोटी रुपयेही दिले आहेत

 • एस-४०० स्क्वाड्रनची डिलिव्हरी ऑक्टोबर २०२० ते एप्रिल २०२३ या काळात होणं प्रस्तावित आहे
 • ऑक्टोबर २०१८ मध्ये भारत आणि रशियाने पाच एस-४०० मिसाइल सिस्टमसाठी ५.४३ बिलियन म्हणजेच जवळपास ४० हजार कोटी रुपयांचा करार केला होता.
 • रशियाकडून मिळणाऱ्या एस-४०० सर्फेस टू एअर मिसाइल प्रणालीची डिलिव्हरी लवकर मिळावी यासाठी भारत आग्रही आहे.
 • भारताने रशियाला आतापर्यंत यासाठी सहा हजार कोटी रुपयेही दिले आहेत. त्यामुळे विनाविलंब एस-४०० भारतीय वायूसेनेच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी भारत प्रयत्नशिल असून त्यासाठी रशियाला विनंती केली जाणार आहे. या मिसाइलमध्ये ३८० कि. मी. क्षेत्रातील लढाऊ विमान, मिसाइल आणि ड्रोन हाणून पाडण्याची क्षमता आहे.
 • ऑक्टोबर २०१८ मध्ये भारत आणि रशियाने पाच एस-४०० मिसाइल सिस्टमसाठी ५.४३ बिलियन म्हणजेच जवळपास ४० हजार कोटी रुपयांचा करार केला होता.
 • रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये होणाऱ्या १९ व्या भारत-रशिया सैन्य आणि सैन्य तंत्रज्ञान सहयोग आंतरशासकीय आयोग (आयआरआयजीसी-एमटीसी) मध्ये मिसाइल लवकर मिळावं यासाठी चर्चा होणार आहे.
 • या बैठकीत भारताकडून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री सरगेई शोइगु सहभागी होतील. दोघेही या बैठकीचे अध्यक्ष असतील. याच बैठकीत अणुशक्तीवर चालणारी पानबुडी अकुला-१ च्या लीजबाबतही चर्चा होईल. या पानबुडीसाठी तीन बिलियन म्हणजेच २१ हजार कोटी रुपयांच्या करारावर यावर्षी मार्चमध्ये हस्ताक्षर करण्यात आले होते.
 • भारत आणि रशिया यांच्यातील प्रतिनिधी स्तरावरील चर्चेत सैन्य सामग्रीबाबत चर्चा होणार आहे. अकुला-१ पानबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सहभागी होत नाही तोपर्यंत आयएनएस चक्रची लीज वाढवली जावी, अशी भारताची इच्छा आहे. अकुला-१ पानबुडी २०२५ पर्यंत भारतीय नौदलाच्या ताफ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.
 • एस-४०० स्क्वाड्रनची डिलिव्हरी ऑक्टोबर २०२० ते एप्रिल २०२३ या काळात होणं प्रस्तावित आहे. भारतासाठी चीन आणि पाकिस्तान यांसारखे शेजारी असताना या प्रणालीचं मोठं महत्त्व आहे. चीननेही रशियाकडून ही प्रणाली खरेदी केली आहे.
 • अमेरिकेच्या निर्बंधानंतरही भारताने रशियासोबत एस-४०० साठी करार केला होता. राजनाथ सिंह गुरुवारी सेंट पीटर्सबर्गमध्ये एस-४०० तयार होत असलेल्या ठिकाणालाही भेट देण्याची शक्यता आहे.

कशी आहे S-400 सिस्टिम:-

 • एस-४०० ही रशियाची जमिनीवरून हवेत मारा करणारी, लांब पल्ल्याची अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. त्याला नाटो संघटनेने एसए-२१ ग्राऊलर असे नाव दिले आहे.
 • त्याद्वारे ३० किमी उंचीवरील आणि ४०० किमी अंतरावरील क्षेपणास्त्रे, विमाने, ड्रोन आदी पाडता येतात. यातील रडार साधारण ६०० किमी अंतरावरील १०० लक्ष्यांचा एका वेळी शोध घेऊन त्यातील सहा लक्ष्ये एका वेळी नष्ट करू शकते.
 • त्यासाठी एस-४०० प्रणालीत चार प्रकारची वेगवेगळ्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. त्यातील ‘९ एम ९६ ई’ हे क्षेपणास्त्र ४० किमीवरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते. ‘९ एम ९६ ई २’ हे क्षेपणास्त्र १२० किमीवर मारा करू शकते. ‘४८ एन ६’ हे क्षेपणास्त्र २५० किमीवर, तर ‘४० एन ६’ हे क्षेपणास्त्र ४०० किमीवर मारा करू शकते.
 • रशियाने १९८०च्या दशकाच्या अखेरीस एस-४०० विकसित करण्यास सुरुवात केली आणि २००७ साली ही यंत्रणा रशियन सेनादलांत सामील झाली. रशियातील मॉस्कोसह काही शहरांना या प्रणालीचे संरक्षण आहे. रशियाने सीरियातील नाविक आणि हवाई तळ आणि युक्रेनकडून बळकावलेल्या क्रिमिया प्रांतात एस-४०० प्रणाली तैनात केली आहे.
 • एस-४०० ही त्यापूर्वीच्या एस-३०० या क्षेपणास्त्र प्रणालीची सुधारित आवृत्ती आहे. तिला नाटोने एसए-१० ग्रंबल असे नाव दिले होते. त्यातील ‘४८ एन ६ ई’ या क्षेपणास्त्राचा पल्ला ५ ते १५० किमी आहे. ती अधिकतम ३० किमी उंची गाठू शकतात. सोव्हिएत सेनादलांत ती १९७९ पासून कार्यरत आहेत. भारतीय सेनादलांत एस-३०० प्रणाली यापूर्वीच कार्यान्वित आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »