एमपीएससी च्या अध्यक्षपदी सतीश गवई यांची नियुक्ती

एमपीएससी च्या अध्यक्षपदी सतीश गवई यांची नियुक्ती
एमपीएससी च्या अध्यक्षपदी सतीश गवई यांची नियुक्ती

प्रभारी अध्यक्ष पदावरून चंद्रशेखर ओक निवृत्त

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य आणि प्रभारी अध्यक्ष पदावरून चंद्रशेखर ओक निवृत्त झाले असून आयोगाच्या अध्यक्ष पदावर निवृत्त अतिरिक्त मुख्यसचिव सतीश गवई यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे.
  • राज्य सरकारच्या सेवेतून 2 वर्षापूर्वी चंद्रशेखर ओक निवृत झाल्यानंतर त्याची लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय अध्यक्ष पदाचा प्रभारी अध्यक्ष पदाची सुत्रही सोपविण्यात आली होती.
  • आयोगाच्या घटनेत कमीत-कमी 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होत पर्यन्त कार्यरत राहु शकतात अशी तरतूद आहे. 
  • ओक यांना 15 सप्टेंबर रोजी 62 वर्ष पूर्ण होत असल्याने आणि पुढील दोन दिवस सुट्टी असल्याने आज शासनातर्फे ओक यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. 
  • आयोगात मिळालेल्या 15 महिन्याच्या कालावधीनंतर ओक आज निवृत झाले असून त्यांनी आपल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.   
  • काही दिवसांपूर्वी उद्योग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावरून सतीश गवई निवृत्त झाले होते. त्यामुळे त्यांची नियुक्ती आयोगाच्या अध्यक्ष पदी नियुक्त केले असून यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जाहीर केले. सतीश गवई यांनाही अध्यक्ष म्हणून दोन वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे. त्याच बरोबर दयानंद मेश्राम हे सदस्य पदावर कार्यरत असून 6 पैकी 4 सदस्य पद अद्यापही रिक्त ठेवण्यात आले आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »