माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन
माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन

सुषमा स्वराज यांचे निधन

देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आकस्मिक निधन.
सुषमा यांच्या निधनाने देश मितभाषी आणि कणखर अशा महिला नेतृत्वाला मुकला.
निधनापूर्वी ४ तास आधी ट्विट करून कलम ३७० बाबत उचललेल्या ऐतिहासिक पावलाबद्दल सुषमा यांनी केलं होतं पंतप्रधान मोदींचं अभिनंदन

देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्या ६७ वर्षांच्या होत्या. सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका मितभाषी आणि तितक्याच कणखर नेतृत्वाला देश मुकला आहे. 

सुषमा यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत होतं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यात यश आलं नाही. तिथे सुषमा यांनी प्राणज्योत मालवली. सुषमा यांच्यासोबत त्यांचे पती व कुटुंबातील अन्य सदस्य होते. सुषमा बऱ्याच काळापासून आजारी होत्या. त्यांचं किडनी ट्रान्सप्लांटही झालं होतं. 

सुषमा यांच्या निधनाचे वृत्त येताच राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह केंद्र सरकारमधील अनेक वरिष्ठ मंत्री तातडीने एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. 

या दिवसाची प्रतीक्षा होती! 

सुषमा स्वराज सोशल मीडियावर फार सक्रिय होत्या. जम्मू-काश्मीरला कलम ३७० च्या जोखाडातून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तसेच जम्मू-काश्मीरचं विभाजन करणारं विधेयक संसेदत मंजूर करून घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल सुषमा यांनी आज सायंकाळी साडेसात वाजता ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. 'मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी' अशा भावनाही सुषमा यांनी या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या होत्या. या ट्विटनंतर काही तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली. 

सुषमा स्वराज यांना देशभरातून श्रद्धांजली

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज रात्री साडे दहाच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. त्या ६७ वर्षांच्या होत्या. सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका मितभाषी आणि तितक्यात कणखर नेतृत्वाला देश मुकला आहे. सुषमा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

निवडणूक न लढवण्याचा निर्णय 

सुषमा स्वराज सर्वप्रथम १९९० मध्ये राज्यसभेवर निवडून आल्या. १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या. सुषमा यांनी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण व नंतर आरोग्य मंत्रालयाची धुरा वाहिली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे सांभाळली. सुषमा यांनी आपल्या ओजस्वी वाणीने जागतिक व्यासपीठांवर दबदबा निर्माण केला. संयुक्त राष्ट्रसंघातील सडेतोड भाषणाने त्यांनी सर्वांची मने जिंकली. सोशल मीडियातून येणाऱ्या विविध तक्रारींचा त्यांनी तिथल्या तिथे निपटारा करून वाहवा मिळवली. सोळाव्या लोकसभेत सुषमा मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीतून त्यांनी स्वत:हून माघार घेतली. प्रकृतीच्या कारणास्तव आपण निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. दिल्लीच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »