महाभियोग ची प्रक्रिया लवकरच

महाभियोग ची प्रक्रिया लवकरच
महाभियोग ची प्रक्रिया लवकरच

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग प्रक्रियेचा ठराव

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग प्रक्रियेचा ठराव प्रतिनिधीगृहात (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्) मांडण्यात आला.
  • ट्रम्प सरकारच्या विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत असलेल्या प्रतिनिधीगृहात महाभियोग कारवाईची प्रक्रिया सुरू होणार असून, ती नागरिकांसमोर जाहीर करण्यात येणार आहे.
  • रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले राजकीय विरोधक जो बिडन यांच्याविरोधात भ्रष्टाचारप्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी युक्रेनवर दबाव आणल्याचा आरोप आहे.
  • याबाबत डेमोक्रॅटिक पक्षाने ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल केला आहे. याबाबतचा आठ पानी प्रस्ताव बुधवारी जाहीर करण्यात आला.
  • गुप्त माहिती समितीचे अध्यक्ष अॅडम शिफ यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी होणार आहे. या प्रस्तावावर आज, गुरुवारी मतदान होण्याची शक्यता आहे.
  • 'राष्ट्राध्यक्षांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून आणि देशाच्या सुरक्षेचा घात करून अमेरिकेच्या निवडणुकीच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचवला याचे पुरावे हाती आले आहेत', असे नियम समितीचे अध्यक्ष जेम्स मॅकगव्हर्न म्हणाले. 'महाभियोग चौकशीत विस्तृत पुरावे व साक्षी समोर आल्या असून, त्या लवकरच अमेरिकी जनतेसमोर मांडण्यात येतील', असे प्रतिनिधीगृहाच्या चार समितीच्या अध्यक्षांनी एकत्र जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
  • यामध्ये अॅडम शिफ यांच्यासह स्थायी निवड समिती, विधी समिती, परराष्ट्र व्यवहार समिती, पर्यवेक्षण व सुधार समितीच्या अध्यक्षांचा समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर आपण भारताच्या महाभियोग विषयी अभ्यास करून ठेवूया
याबद्दल तुम्ही सेल्फ स्टडी करा. आम्ही लवकरच यावर नोट्स देखील उपलब्ध करून देऊ

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »