चांद्रयान २ विक्रम लँडर आज विलग होणार

चांद्रयान २ विक्रम लँडर आज विलग होणार
चांद्रयान २ विक्रम लँडर आज विलग होणार

विक्रम लँडर आणि त्याच्यामध्ये असणारे प्रग्यान रोव्हर आता अखेरचे काही तास एकत्रित

  

 

 

 

 

 

Countdown_Begins

  • 'चांद्रयान-२'ची पाचवी आणि अखेरची कक्षा सुधारणा करून यानाला चंद्राभोवती ११९ बाय १२७ किलोमीटरच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) रविवारी यश आले.
  • रविवारी संध्याकाळी सहा वाजून २१ मिनिटांनी यानाचे इंजिन ५२ सेकंदांसाठी प्रज्वलित करून ही सुधारणा करण्यात आली. 
  • 'चांद्रयान-२', विक्रम लँडर आणि त्याच्यामध्ये असणारे प्रग्यान रोव्हर आता अखेरचे काही तास एकत्रित असतील.
  • सोमवारी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटे ते एक वाजून ४५ मिनिटे या कालावधीत विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे केले जातील.
  • त्यानंतर विक्रम लँडरला चंद्राच्या जमिनीवर उतरवण्याचा घटनाक्रम सुरू होईल. ३ सप्टेंबरला विक्रम लँडरची चंद्राभोवतीची कक्षा १०९ बाय १२० किलोमीटर करण्यात येईल.
  • त्यानंतर ४ सप्टेंबरला ती आणखी कमी करून ३६ बाय ११० किलोमीटर करण्यात येईल.
  • ७ सप्टेंबर रोजी पहाटे ०१:३० ते ०२:३० दरम्यान लँडर आणि रोव्हरला चंद्रावर उतरवण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल. 
     

 

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »