थायलंड ओपन 2019

थायलंड ओपन 2019
थायलंड ओपन 2019

सात्विकराज चिरागला विजेतेपद

भारताच्या सात्विकराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष दुहेरी प्रकारात विजेतेपदावर मोहोर उमटवून इतिहास रचला आहे. सात्विकराज आणि चिराग 'सुपर टूर्नामेंट ५००' प्रकारात अव्वल येणारी पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे. 

या जोडीने अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनच्या ली जुन हुई आणि लियू यू चेन या जोडीचा २१-१९, १८-२१, २१-१८ अशा फरकाने पराभव केला. हा सामना एक तास आणि दोन मिनिटे रंगला. विशेष म्हणजे, सात्विकराज आणि चिरागने याच वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत या चिनी जोडीचा सामना करावा लागला होता. त्यावेळी चिनी जोडीने २१-१९, २१-१८ अशा फरकाने विजय नोंदवला होता. 

थायलंड ओपनमधील अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासून सात्विकराज आणि चिरागने चांगला खेळ करत आघाडी कायम ठेवली. चिनी जोडीने खेळात परतण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जोडीने चीनच्या जोडीला संधी दिली नाही. मध्यतरानंतर चीनी जोडीने भारतीय जोडीशी १५-१५ बरोबरी केली. पण, सात्विकराज आणि चिरागने प्रयत्नांची शर्थ करत पहिला सेट जिंकला. 

दुसऱ्या सेटच्या सुरूवातीला भारतीय जोडीने पुन्हा ५-२ अशी आघाडी केली. मात्र, जोरदार पुनरागमन करत चीनच्या जोडीने २१-१८ अशा फरकाने दुसरा सेट खिशात घातला. तिसऱ्या सेटमध्ये चिनी जोडीने चांगली सुरुवात केली. मात्र, त्यानंतर सात्विकराज आणि चिराग यांनी खेळात सुधारणा करत तिसरा सेट आपल्या नावे करून थायलंड ओपनच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »