ब्रिटनच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या तिघांचा समावेश

ब्रिटनच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या तिघांचा समावेश
ब्रिटनच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या तिघांचा समावेश

गृहमंत्री म्हणून प्रीती पटेल म्हणून समावेश

ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गृहमंत्री म्हणून प्रीती पटेल यांच्यासह मूळ भारतीय वंशाच्या तिघांचा त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून समावेश केला आहे. ब्रिटनचे ‘सर्वात वैविध्यपूर्ण मंत्रिमंडळ’ असे याचे वर्णन केले जात आहे. कुठल्याही जर-तर शिवाय ब्रिटन ३१ ऑक्टोबरला युरोपीय महासंघातून बाहेर पडेल, असा निर्धार जॉन्सन यांनी व्यक्त केला आहे.

राणी एलिझाबेथ यांनी जॉन्सन यांची ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून नेमणूक केल्यानंतर काही तासांतच त्यांनी प्रीती पटेल यांची गृहमंत्रिपदी, आलोक शर्मा यांची आंतरराष्ट्रीय विकास मंत्रिपदी, तर ऋषी सुनाक यांची वित्त विभागाचे प्रमुख मंत्री म्हणून नेमणूक केली. गुरुवारी सकाळी १० डाऊनिंग स्ट्रीट येथे मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली.

आम्ही आमच्या लोकशाहीवरील विश्वास पुनस्र्थापित करू. संसदेने लोकांना वारंवार दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करणार असून, कुठल्याही जर-तर शिवाय ३१ ऑक्टोबरला युरोपीय महासंघातून बाहेर पडू, असे पंतप्रधान म्हणून बुधवारी केलेल्या पहिल्याच भाषणात जॉन्सन म्हणाले.

ब्रेग्झिट समर्थन मोहिमेतील जॉन्सन यांच्या सहकारी असलेल्या प्रीती पटेल यांच्याकडे ब्रिटनची सुरक्षा, इमिग्रेशन आणि व्हिसाविषयक धोरणांचा कार्यभार राहणार आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »