जगातील टॉप टेन सीईओंमध्ये तिघे भारतीय

जगातील टॉप टेन सीईओंमध्ये तिघे भारतीय
जगातील टॉप टेन सीईओंमध्ये तिघे भारतीय

हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू

 • जगातील १०० उत्तम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसंदर्भात (सीईओ) हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूने केलेल्या ताज्या सर्वेक्षणात, चालू वर्षातील सर्वोत्कृष्ट दहा सीईओंमध्ये भारतीय वंशाच्या तिघा सीईओंचा समावेश झाला आहे.
 • उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १०० सीईओंमध्ये अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपनी असलेल्या एनव्हिडीयाचे सीईओ जेन्सन हुयांग यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
 • सर्वोत्कृष्ट दहा सीईओंमध्ये सहाव्या क्रमांकावर अॅडोब कंपनीचे सीईओ शंतनू नारायण
 • सातव्या क्रमांकावर मास्टरकार्डचे सीईओ अजय बंगा
 • तर नवव्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांची निवड झाली आहे.
 • १०० सीईओंच्या या यादीत डीबीएस बँकेचे सीईओ पीयूष गुप्ता यांचा ८९ वा क्रमांक असून अॅपलचे सीईओ टिम कूक हे ६२ व्या क्रमांकावर आहेत. या यादीमध्ये असलेल्या सीईओंची कारकीर्द पाहता सरासरी ४५ व्या वर्षी सीईओ झालेले तसेच १५ वर्षे कंपनीत असलेल्या व्यक्ती अधिक आहेत.

हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यूचे निकष:-

 • सन २०१५ पासून हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यू प्रसिद्ध केला जातो.
 • सीईओंनी केलेली आर्थिक कामगिरीच केवळ विचारात न घेता, त्याचबरोबर पर्यावरणीय, सामाजिक व प्रशासनदृष्ट्या पडलेला प्रभावही विचारात घेतला जातो (महत्वाचे आणि कौतुकास्पद).
 • भागधारकांना मिळालेला लाभांशाच्या पुनर्गुंतवणुकीसह मिळालेला परतावा, जो देश व उद्योग यांनी समायोजित केला आहे तसेच बाजार भांडवलातील बदल या मुख्य निकषांवर सीईओंच्या कारकीर्दीचे मूल्यमापन हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यू करतो.

यंदा अॅमेझॉन नाही:-

 • हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यूच्या पहिल्या वर्षापासून अॅमेझॉनचे सीईओ जेप बेझोस यांचे नाव सर्वोत्कृष्ट सीईओंच्या यादीत असते.
 • यावर्षी मात्र अॅमेझ़नचा समावेश या यादीत झालेला नाही.
 • पर्यावरणीय, सामाजिक व प्रशासनदृष्ट्या पडलेला प्रभाव या तिन्ही निकषांवर अॅमेझॉन अपयशी ठरल्यामुळे हा समावेश होऊ शकलेला नाही.(vvimp)

 

प्रश्न : जगातील १०० उत्तम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसंदर्भात (सीईओ) हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूने केलेल्या सर्वेक्षणाची यादी नुकतीच प्रकाशित झाली, यासंदर्भात खालीलपैकी असत्य असणारे विधान/विधाने ओळखा.
अ. चालू वर्षातील सर्वोत्कृष्ट दहा सीईओंमध्ये भारतीय वंशाच्या तिन सीईओंचा समावेश आहे.
ब. पहिल्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला हे आहेत तर सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर अनुक्रमे शंतनू नारायण आणि अजय बंगा हे आहेत.
क. पर्यावरणीय, सामाजिक व प्रशासनदृष्ट्या पडलेला प्रभाव या तिन्ही निकषांवर अॅमेझॉन अपयशी ठरल्यामुळे अॅमेझॉनचा यात समावेश होऊ शकलेला नाही.
१. फक्त अ आणि क
२. फक्त ब
३. फक्त क
४. कोणतेही नाही

 

 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »