ऑलम्पिकसाठी भारत प्रथमच ऑलम्पिक आतिथ्यगृह उघडणार

ऑलम्पिकसाठी भारत प्रथमच ऑलम्पिक आतिथ्यगृह उघडणार
ऑलम्पिकसाठी भारत प्रथमच ऑलम्पिक आतिथ्यगृह उघडणार

JSW ग्रुप या उद्योग समूहाच्या सहकार्याने भारतीय ऑलम्पिक संघ (IOA) ही सुविधा उभारणार

  • टोकियो (जापान) या शहरात होणार्‍या ‘2020 उन्हाळी ऑलम्पिक’ स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंना आणि काही विशेष अतिथिंच्या सुविधेसाठी ऑलम्पिकच्या इतिहासात भारताने प्रथमच ‘इंडिया हाऊस’ या नावाने एका ऑलम्पिक आतिथ्यगृहाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे.

स्थापनेबद्दल:-

  • आरिआके या ठिकाणी उघडण्यात येणाऱ्या इंडिया हाऊसच्या जवळ चार खेळांचे आयोजन स्थळसुद्धा होणार आहे.
  • JSW ग्रुप या उद्योग समूहाच्या सहकार्याने भारतीय ऑलम्पिक संघ (IOA) ही सुविधा उभारणार आहे.
  • ऑलम्पिकमध्ये भाग घेणार्‍या अनेक देशांचे स्वतःचे आतिथ्यगृह आहेत, पण एखाद्या देशाने आपला सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्याची ही पहिली वेळ ठरणार आहे. यामध्ये भारतीय संस्कृती, कला, पाककृती आणि योग प्रदर्शन या बाबींचा समावेश असणार आहे.
  • इंडिया हाऊसमध्ये भारतीय पाहुणचाराबरोबरच भारतीय संघाचे ऑलम्पिकमधले प्रदर्शन आणि भारतीय संघाचा अधिकृत पोशाख याचेही प्रदर्शन घडविले जाणार. त्याचबरोबर ऑलम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा विशेष सन्मान देखील IOA करणार आहे.
  • इंडिया हाऊसमध्ये भारतीय खेळाडूंबरोबरच सर्वसामान्य लोकसुद्धा या हाऊसमध्ये येऊ शकणार आहेत. सकाळच्या सत्रात सर्वसामान्यांसाठी हे हाऊस उघडे ठेवण्यात येणार आहे.
  • यादरम्यान योग प्रदर्शनाबरोबरच देशाने विविध खेळात केलेल्या विक्रमांचेही प्रदर्शन केले जाणार आहे.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »