भारतीय हॉकीला टोकियोचे तिकीट

भारतीय हॉकीला टोकियोचे तिकीट
भारतीय हॉकीला टोकियोचे तिकीट

पुरुष आणि महिला हॉकी संघ खेळणार ऑलिम्पिकमध्ये

पुरुष आणि महिला हॉकी संघ खेळणार ऑलिम्पिकमध्ये

 • भारतीय महिला आणि पुरुष हॉकी संघांनी २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमधील आपला प्रवेश निश्चित केला आहे.
 • महिलांनी सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्याचा मान मिळविला तर पुरुषांनी रशियावर ७-१ असा विजय मिळवत ऑलिम्पिकचे दरवाजे उघडले आहेत.
 • येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरी हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाला अमेरिकेकडून दुसऱ्या टप्प्याच्या लढतीत १-४ असा पराभव स्वीकारावा लागला, पण दोन सामन्यांतील एकूण गोलसंख्येच्या जोरावर (६-५) भारताने ऑलिम्पिकमधील प्रवेश पक्का केला.
 • पुरुषांनी मात्र रशियावर ७-१ असा मोठा विजय मिळवून ऑलिम्पिकमध्ये धडक मारली. कर्णधार राणी रामपालने एक गोल करत भारतीय महिला संघाला आघाडी मिळवून दिली.
 • अमेरिकेविरुद्ध भारताला हार पत्करावी लागली असली तरी ६-५ या आघाडीसह त्यांनी टोकियोचे तिकीट निश्चित केले आहे. २०१६मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघ ३६ वर्षानंतर पात्र ठरला होता. यावेळी पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्याची संधी महिलांनी साधली.
 • भारतीय महिला हॉकी संघासाठी ऑलिम्पिकचा मार्ग मोकळा झाला असला तरी अमेरिकेविरुद्धच्या दुसऱ्या टप्प्याच्या लढतीतील त्यांची कामगिरीची चिंताजनकच होती. पहिल्या सामन्यात भारताने अमेरिकेला ५-१ असे पराभूत केले होते.
 • त्यामुळे या दुसऱ्या सामन्यातही भारत सहज विजयी होईल, अशी आशा होती. मात्र अमेरिकेने सारे मनसुबे उधळून लावले. त्यांनी पहिल्या २८ मिनिटांतच ४-० अशी आघाडी घेऊन भारताला मोठा धक्का दिला.
 • या आघाडीमुळे दोन्ही संघ दोन्ही सामन्यांतील एकूण गोलसंख्येच्या बाबतीत ५-५ असे बरोबरीत आले. अमेरिकेच्या अमंडा मॅगादान (५वे आणि २८वे मिनिट), कर्णधार कॅथलिन शार्की (१४वे मिनिट), अॅलिसा पार्कर (२०वे मिनिट) यांनी गोल केले.
 • सामन्याला प्रारंभ झाला तेव्हापासून अमेरिकेने आपल्या आक्रमणाची धार तेज ठेवली. त्याला प्रत्युत्तर देणे भारतीय खेळाडूंना कठीण जात होते. भारतीय महिलांना चेंडूवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत होत्या. अवघ्या मिनिटभराच्या खेळादरम्यान अमेरिकेने दोन पेनल्टी कॉर्नर मिळविले. पण त्याचे गोलमध्ये रूपांतर झाले नाही.
 • पाचव्या मिनिटाला मात्र त्यांचे खाते उघडले. १४व्यामिनिटाला कर्णधाराने गोल करून अमेरिकेला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आक्रमक खेळी त्यांनी कायम ठेवली आणि २०व्या मिनिटाला तिसरा गोल करून भारताला मोठा धक्का दिला.
 • भारतीय बचावाच्या अमेरिकेच्या खेळाडूंनी चिंध्या उडविल्या. भारताने अर्थातच दोन पेनल्टी कॉर्नर मिळविले पण त्याचा फायदा काही भारतीय खेळाडूंना मिळविता आला नाही.
 • त्यानंतर २८व्या मिनिटाला भारताच्या नवनीत कौरला पंचांनी पिवळे कार्ड दाखविले. त्याचदरम्यान अमेरिकेच्या अमंडाने आपला दुसरा गोल नोंदविताना आपल्या संघाला ४-० अशी मोठी आघाडी मिळवून दिली.
 • भारताला नंतर पेनल्टी कॉर्नरची संधी चालून आली होती, पण त्याचे गोलमध्ये काही रूपांतर झाले नाही. ४८व्या मिनिटाला कर्णधार राणीने गोल करून भारताला एकूण गोलसंख्येत ६-५ अशी आघाडी मिळवून दिली. ती निर्णायक ठरली.
 • चार मिनिटे राहिलेली असताना अमेरिकेलाही पेनल्टी कॉर्नर मिळाला मात्र भारताने त्याविरोधात अपील केल्यावर ते अपील मान्य केले गेले आणि पेनल्टी कॉर्नर रद्द करण्यात आला. तिथेच भारताचा ऑलिम्पिक प्रवेश निश्चित झाला.

दृष्टिक्षेप:-

 • भारतीय महिला संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश केला.
 • अमेरिकेकडून दुसऱ्या लढतीत मात्र भारताची १-४ अशी हार.
 • सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्याची कामगिरी.
 • भारताने दोन सामन्यांमध्ये मिळून अमेरिकेवर ६-५ अशी गोलची आघाडी घेतली.

पुरुषांची रशियावर मात:-

 • आठवेळा ऑलिम्पिक हॉकीचे विजेते ठरलेल्या भारतीय पुरुष संघाने २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. भारताने रशियावर ७-१ अशी दणदणीत मात करत ही कामगिरी केली.
 • जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या भारताने पहिल्या फेरीत रशियावर ४-२ अशी मात केली होती. शनिवारी झालेल्या या दोन देशातील दुसऱ्या सामन्यात आकाशदीप सिंग (२३ व २९वे मिनिट), रुपिंदर पाल सिंग (४८ व ५९वे मिनिट), ललित उपाध्याय (१७वे मिनिट), नीलकांत शर्मा (४७वे मिनिट) आणि अमित रोहिदास (६०वे मिनिट) यांनी भारतातर्फे गोल केले.
 • खरे तर रशियाने सुरुवात झोकात केली आणि पहिल्या काही सेकंदांतच १-० अशी आघाडी घेतली. पण त्यापलीकडे त्यांची मजल जाऊ शकली नाही.

 

आपण होतकरू विद्यार्थयांसाठी एक प्रकल्प राबवत आहोत व्हिजन प्लॅटफॉर्मच्या व्हिडीओ सेशनमधून तुम्हाला याची कल्पना आली असेलच
प्रकल्प असा आहे जे विद्यार्थी अभ्यासात सातत्य ठेवून व्हिजन प्लॅटफॉर्मवरील सर्व नोट्स, व्हिडीओ सेशन रेग्युलर FALLOW करतील त्यांचे नाव आपल्या व्हिजन पोर्टलवर झळकावले जाईल.

आता हे कसे समजेल की कोण किती सातत्याने अभ्यास करत आहे?? तर जो विद्यार्थी व्हिडीओ सेशन्सच्या खाली तसेच PDF नोट्सच्या खाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल तसेच त्याचे जास्तीचे ज्ञान इतरांबरोबर शेअर करेल त्या विद्यार्थ्याचे नाव दर आठवड्याला 'ASPIRANT OF THE WEEK'  म्हणून घोषित केले जाईल. तुमची अभ्यासाची भूक  वाढवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न 'घातलेल्या सादेला प्रतिसाद मिळाला की प्रवास सुंदर होतो', त्यामुळे तुम्ही छान रीतीने प्रतिसाद द्याल अशी आम्ही अशा बाळगतो शुभेच्छा..!!

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »