तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर

तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर
तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर

25 जुलै रोजी तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजुर करण्यात आले होते

राज्यसभेत मंगळवारी(30 july) तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यात आले. ९९ विरूद्ध ८४ च्या फरकाने हे विधेयक मंजूर झाले. तिहेरी तलाक विधेयकावर राज्यसभेत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. दरम्यान, भाजपाने या विधेयकाचे समर्थन करत हे विधेयक म्हणजे महिलांच्या सन्मानासाठी तयार करण्यात आलेले विधेयक असल्याचे म्हटले. मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अनुपस्थित होते. तसेच टीएसआर, बसपाच्या खासदारांनीही यावेळी सभात्याग केला. दरम्यान, हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु भाजपाने याला विरोध केला. १००विरूद्ध ८४ च्या फरकाने हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

तिहेरी तलाक विधेयक गुरूवारी(25 july) लोकसभेत मंजुर कंरण्यात आले होते. त्यानंतर ते मंजुरीसाठी राज्यसभेत पाठवण्यात आले होते. प्रदीर्घ चर्चेनंतर तिहेरी तलाक विधेयक गुरूवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले.  या विधेयकाच्या बाजूनं ३०३ मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात ८२ मते पडली. त्यावेळी या विधेयकाला विरोध दर्शवत जदयू, टीएसआर, वायएसआर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला होता. दरम्यान, रविशंकर प्रसाद यांनी या विधेयकावरील चर्चेदरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर २४ जुलैपर्यंत तिहेरी तलाकची ३४५ प्रकरणं समोर आल्याचे सांगितले होते. तसेच हा माणुसकीचा प्रश्न असून आम्हाला मुस्लिम भगिनींची चिंता असल्याचे ते म्हणाले होते.

सर्वोच्च न्यायालयाने शाह बानो विरुद्ध भारत सरकार या याचिकेत बहुमताने निकाल देत तिहेरी तलाक हा राज्यघटनेशी पूर्णत: विपरीत, गैरसंवैधानिक ठरविला होता. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये केंद्र सरकारतर्फे लोकसभेत ‘तिहेरी तलाक’ विधेयक मांडले गेले आणि ते पारितदेखील झाले. केंद्र सरकारतर्फे डिसेंबर २०१७ मध्ये मांडले गेलेले ‘तिहेरी तलाक बिल’ राज्यसभेत मात्र रखडले. म्हणून सप्टेंबर २०१८ मध्ये केंद्र सरकारने याबाबतचा नवीन अध्यादेश काढला आणि त्यानुसार पूर्वीचे विधेयक रद्द करून ‘Muslim Women (Protection of rights on Marriages) Bill 2018’ असे नवीन विधेयक हिवाळी अधिवेशनात लोकसभेत मंजूर करून घेतले. परंतु राज्यसभेत हे विधेयक प्रलंबित राहिले होते.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »