भारताच्या पाच महिला पोलिस अधिकायांना यूएन मेडल

भारताच्या पाच महिला पोलिस अधिकायांना यूएन मेडल
भारताच्या पाच महिला पोलिस अधिकायांना यूएन मेडल

दक्षिण सुदानमधील युनायटेड नेशन्स मिशन

 • दक्षिण सुदानमधील युनायटेड नेशन्स मिशनमध्ये उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल भारताच्या पाच महिला पोलिस अधिका्यांना संयुक्त राष्ट्रांचे पदक देण्यात आले आहे. 
 • 10 सप्टेंबर रोजी ज्युबा, दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्रांच्या मिशन येथे झालेल्या परेड दरम्यान हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 • चंदीगड पोलिसांत इन्स्पेक्टर रीना यादव, महाराष्ट्र पोलिसांत डीएसपी गोपीका जहागीरदार, गृह मंत्रालयात डीएसपी भारती सामंत्रे, गृह मंत्रालयाची रागिनी कुमारी आणि राजस्थान पोलिसांत एएसपी कमल शेखावत यांचा समावेश आहे. 
 • युद्धग्रस्त दक्षिण सुदानमधील नागरिकांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्राच्या आदेशाचे पालन केल्याबद्दल भारतीय महिला अधिका्यांचा गौरव झाला आहे.

दक्षिण सुदान:-

 • दक्षिण सुदान  हा पूर्व आफ्रिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे.
 • दक्षिण सुदानला २०११ साली सुदान देशापासून स्वातंत्र्य मिळाले.
 • दक्षिण सुदानच्या उत्तरेला सुदान, पूर्वेला इथियोपिया, आग्नेयेला केनिया, दक्षिणेला युगांडा, नैऋत्येला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक तर पश्चिमेला मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक हे देश आहेत.
 • पांढरी नाईल ही नाईल नदीची प्रमुख उपनदी दक्षिण सुदानच्या मध्यभागातून वाहते.
 • जुबा ही दक्षिण सुदानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 • जानेवारी २०११ मध्ये येथे घेण्यात आलेल्या सार्वमतामध्ये ९८.८३ टक्के मतदारांनी सुदान देशापासून वेगळे होण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. त्यानुसार ९ जुलै २०११ रोजी दक्षिण सुदान हा एक स्वतंत्र व सार्वभौम देश म्हणून अस्तित्त्वात आला.
 •  दक्षिण सुदानला आफ्रिकन संघ, संयुक्त राष्ट्रे इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्यत्व मिळाले आहे.
 • सुदान व दक्षिण सुदानदरम्यानच्या प्रस्तावित सीमेबद्दल अजून वाद व चकमकी सुरू आहेत.
 • सुदानची ही फाळणी धार्मिक भेदांवरून झाली. दक्षिण सुदानमध्ये बहुसंख्य ख्रिश्चन आहेत तर (उत्तर) सुदानमध्ये मुस्लिम.
 • दक्षिण सुदान हा अतिशय गरीब देश आहे. लोकांचे दरडोई दैनिक उत्पन्न ५० भारतीय रुपयांपेक्षा कमी आहे.

प्रश्न. खालीलपैकी योग्य असणारे विधान/विधाने ओळखा.
अ. दक्षिण सुदान हा पूर्व अमेरिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे.
ब. पांढरी नाईल ही नाईल नदीची प्रमुख उपनदी दक्षिण सुदानच्या मध्यभागातून वाहते.
क. खार्टूम ही दक्षिण सुदानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
1.  फक्त अ आणि ब 
2.  फक्त ब
3.  फक्त अ आणि क 
4.  अ, ब आणि क तिन्हीही 
 

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »