विक्रम चंद्रावर जोराने आदळले नासाची छायाचित्रे प्रसिद्ध

विक्रम चंद्रावर जोराने आदळले नासाची छायाचित्रे प्रसिद्ध
विक्रम चंद्रावर जोराने आदळले नासाची छायाचित्रे प्रसिद्ध

नासाचे ऑर्बिटर एलआरओने टिपली छायाचित्रे

  • 'नासा' या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने 'चांद्रयान-२' मोहिमेतील विक्रम लँडरची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
  • 'विक्रम' लँडर चंद्रावर उतरताना जोरात आदळले असे नासाने या छायाचित्रांच्या आधारे स्पष्ट केले आहे. नासाने प्रसिद्ध केलेली ही हाय रेझॉल्यूशन छायाचित्रे ऑर्बिटरद्वारे खेचलेली आहेत.
  • विक्रम लँडरने चंद्रावरील एका सपाट भूमीवर उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र विक्रमचे हे उतरणे अपेक्षेनुसार होऊ शकले नाही.
  • या नंतर ७ सप्टेंबरला विक्रमचा इस्रोशी संबंध तुटला. विक्रम चंद्रावर उतरताना जोराने आदळले हे स्पष्ट झाल्याचे नासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
  • विक्रम नेमक्या कोणत्या जागी आदळले हे अजूनही निश्चितपणे सांगता येत नाही. ही छायाचित्रे १५० किमी इतक्या अंतरावरून काढण्यात आली आहे.

स्थानाबाबत अजूनही संशय:-

  • विक्रमला ७ सप्टेंबरला चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरायचे होते. चंद्रावर अलगद उतरण्याचा भारताचा हा पहिलाच प्रयत्न होता. नासाचे ऑर्बिटर (एलआरओ) विक्रम जेथे उतरले त्या जागेवरून १७ सप्टेंबर या दिवशी गेले. त्याच वेळी ही हाय रेझॉल्यूशन छायाचित्रे टिपण्यात आल्याचे नासाने म्हटले आहे. अजूनही एलआरओसीच्या टीमला छायाचित्रे आणि लँडरच्या ठिकाण कोणते हे ओळखता आलेले नाही.

Simpelius N आणि Manzinus C क्रेटर्सच्या मध्यभागी विक्रमने केला उतरण्याचा प्रयत्

ऑक्टोबरमध्ये विक्रमची छायाचित्रे टिपण्याचा प्रयत्न:-

  • नासाचे ऑर्बिटर पुन्हा एकदा लँडिंग ठिकाजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नासाने म्हटले आहे. १४ ऑक्टोबर या दिवशी प्रकाशाची स्थिती चांगली असेल आणि याचाच फायदा घेत पुन्हा छायाचित्रे टिपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
  • जेव्हा ही छायाचित्रे टिपण्यात आली तेव्हा तिथे धुके होते. अशाच धुक्याने वेढलेल्या जागेवर विक्रम लँडर असू शकते आणि म्हणूनच ते दिसत नसावे, अशी माहिती लूनार रिझॉनन्स ऑर्बिटर मोहिमेचे उप प्रकल्प शास्त्रज्ञ जॉन केलर यांनी दिली आहे.
  • ऑक्टोबरमध्ये चांगला प्रकाश असेल आणि याचा फायदा उठवत पुन्हा छायाचित्रे काढली जातील असेही केलर म्हणाले.

 

 

एक छोटीशी गोष्ट:-

ज्याचा स्वतः:वर ठाम विश्वास असतो तो अडथळ्यांना न घाबरता, वस्तुस्थिती स्वीकारून पुन्हा प्रयत्न करत राहतो.
आज मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते.
तुम्ही वाघाला कधी शिकार करताना पाहिलंय का? जेव्हा तो त्याच्या भक्षकावर लक्ष केंद्रित करत असतो, तेव्हा तो एकाग्रतेणे त्याच्याकडे पाहत असतो, त्याला अगदी नखशिकांत न्याहाळत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो काही पाऊले  मागे जाऊन मग आपल्या भक्षकाला टार्गेट करतो आणि त्याच्यावर झेप घेतो.
सांगण्याचा उद्देश्य इतकाच की वाघ दोन पाऊले मागे जातो म्हणून तो मांजर होतो का?? नाही तो वाघच राहतो. दोन चार पाऊले मागे जाणे म्हणजे हारणे नव्हे It's all about strategy!!

 

ही गोष्ट शेअर करण्याचा उद्देश म्हणजे, गेले कित्येक दिवसापासून 'विक्रम' शी आपण सगळेच भावनिकरीत्या जोडलेलो होतो/आहोत. ही बातमी वाचून एक भारतीय म्हणून कुठेतरी वाईट वाटण साहजिकच आहे, पण ह्यातून शिकूया आणि पुढे जाऊया.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »