विक्रम शी पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न: इस्रो

विक्रम शी पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न: इस्रो
विक्रम शी पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न: इस्रो

आगामी १४ दिवस विक्रमशी संपर्क साधण्यात येणार

 • विक्रम लँडरसोबतचा संपर्क तुटला असला तरी इस्रोच्या शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास तुटला नाही.
 • इस्रोकडून विक्रमसोबत पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी १४ दिवस विक्रमशी संपर्क साधण्यात येणार असल्याची माहिती इस्रो प्रमुख के. सिवन यांनी दिली. 
 • चंद्रावर उतरण्यासाठी अवघे दोन किलोमीटरचे अंतर शिल्लक असताना विक्रमसोबतचा संपर्क तुटला होता. विक्रम चंद्रभूमीपासून २.१ किमी अंतरावर असताना इस्रो केंद्रासोबत त्याचा संपर्क सामान्य होता. 
 • मात्र, अचानक संपर्क तुटल्यामुळे चांद्रयान-२ मोहिमेला धक्का बसला. इस्रो प्रमुख के. सिवन यांनी सांगितले की, विक्रमसोबत पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
 • चांद्रयान-२ मोहीम जवळपास ९५ टक्के यशस्वी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रयान-२ चा ऑर्बिटर जवळपास ७.५ वर्षापर्यंत कार्यरत राहू शकतो. त्याशिवाय गगनयानसह इस्रोच्या अन्य अंतराळ मोहिमादेखील वेळेतच पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

चांद्रयान २: परदेशी माध्यमातून कौतुकोवर्षाव:-

 • इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेवर फक्त भारतीयांचे नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. 'विक्रम'चे सॉफ्ट लँडिंग करण्यास अपयश आले असले तरी जगभरातील प्रमुख माध्यमांनी भारताच्या या अंतराळ मिशनची दखल घेतली आहे.
 • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'चांद्रयान-२'ची मोहीम होती. याआधी कोणत्याच दे्शाची चांद्रमोहीम या ठिकाणी झाली नव्हती. त्यामुळेचन संपूर्ण जगाचे लक्ष या अंतराळ मोहिमेवर लागले होते. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, बीबीसी आणि गार्डियन यांच्यांसह अनेक प्रसारमाध्यमांनी भारताच्या चांद्रयान मोहिमेची दखल घेतली.
 • चांद्रयान-२ हे भारताचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याचे अमेरिकन मॅगझिन वायरने म्हटले. विक्रम लॅडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर यशस्वीरीत्या उतरवण्यास अपयश आल्यामुळे भारताला धक्का बसला आहे. मात्र, हे अपयश म्हणजे पराभव आहे, असे समजू नये असेही यात म्हटले आहे. 
 • भारताने विकसित केलेले तंत्रज्ञान आणि अनेक दशकांपासून विकसित होत असलेला अंतराळ कार्यक्रम यातून भारताची जागतिक स्तरावरील अंतराळ क्षेत्रातील महत्त्वकांक्षा अधिक प्रबळ असल्याचे दिसून येत असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. चांद्रयान-२चे एक ऑरबीटर अजूनही चंद्राभोवती आहे. त्यामुळे ही मोहीम अंशत: अपयशी झाली असे म्हणावे लागत असून चंद्रावर उतरणाऱ्या देशांच्या यादीत येण्यासाठी भारताला आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले.
 • ब्रिटीश वृत्तपत्र द गार्डियनने आपल्या लेखात इस्रोच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. भारताच्या चांद्रयान २ ला अपयश आले असले तरी भारतीय नागरिकांना याचे विशेष कौतुक वाटत असून राष्ट्राभिमानाची भावना उंचावली असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. सोशल मीडियावर भारतीय संशोधकांना मोठा पाठिंबा मिळाला असून अपयशातून संशोधक भरारी घेतील. या मोहिमेमुळे तरुणांनाही प्रेरणा मिळणार असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले. चांद्रयान-२ वर करण्यात आलेला खर्च हा अमेरिकेच्या अपोलो मिशनच्या खर्चाचा छोटा हिस्सा असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
 • नासाचे शास्त्रज्ञ जेरी लिनेंगरनेदेखील भारताच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. भारताची मोहीम साहसपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताने कठीण बाब साध्य करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.
   

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »