महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला कांस्य पदक

महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला कांस्य पदक
महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला कांस्य पदक

५३ किलो वजनी गटात कांस्य पदक

 • भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. 
 • विनेशने रेपेचेज मुकाबल्यात ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीला पराभूत करून ५३ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं आहे. 
 • या विजयाबरोबरच २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचं तिकीट मिळवणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे.
 • या आधी अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रांटचा ८-२ ने पराभव करून विनेश कांस्य पदकासाठी क्वालीफाय झाली होती. साराने गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये ५३ किलो वजनी गटात रजत पदक पटकावलं होतं. 
 • या आधी विनेशला जापानच्या मायू मुकैदाने पराभूत केलं होतं. त्यामुळे जागतिक कुस्ती चॅम्पियनशीपमधून तिला बाहेर पडावं लागलं होतं. 
 • मात्र तिला नशीबाने साथ दिली आणि रेपेचेज राऊंडमध्ये पदक मिळविता आलं. त्यामुळे २०२० मध्ये प्रवेश मिळणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे.

विनेश फोगट:-

 • विनेश फोगट (२५ ऑगस्ट, १९९४) ही भारतीय कुस्तीगीर आहे. कुस्ती खेळणाऱ्या फोगट भगिनींच्यापैकी ती एक आहे. 
 • तिने २०१८ साली इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.
 • ही महावीर सिंग फोगट यांची पुतणी असून महावीर फोगट यांच्या मुली गीता फोगट आणि बबिता कुमारी फोगट तसेच रितू फोगट या सुद्धा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या कुस्तीगीर आहेत.
 • २०१३ साली भारतातील नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत विनेशने ५२ किग्रॅ गटात कांस्य पदक जिंकले.
 • २०१३ साली जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या राष्ट्रकुल कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत विनेशने ५१ किग्रॅ गटात रजत पदक जिंकले.
 • २०१४ साली ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ४८ किग्रॅ गटात विनेशने सुवर्णपदक जिंकले.
 • २०१४ साली इंचेऑन, दक्षिण कोरिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ४८ किग्रॅ गटात विनेशने कांस्यपदक जिंकले.
 • २०१५ साली दोहा, कतार येथे झालेल्या आशियाई अजिंक्य स्पर्धेत विनेशने रौप्य पदक जिंकले. इस्तंबूल येथे २०१६ रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी झालेल्या पात्रता स्पर्धेत तिने अंतिम फेरी जिंकून ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग निश्चित केला.
 • २०१६ साली रीओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत विनेशकडून पदकाची अपेक्षा केली जात होती. मात्र चीनच्या सन यानान बरोबर झालेल्या उपांत्यपूर्व लढतीच्या वेळी गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तिला सामना सोडून द्यावा लागला.
 • २०१८ साली गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विनेशने ४८ किग्रॅ गटात विनेशने सुवर्णपदक जिंकले.
 • २०१८ साली इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेशने सुवर्णपदक जिंकले आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीगीर ठरली.

What do you think?

Earn & Learn

विद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही "कमवा व शिका" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...!!

Read More »